Homeताज्या बातम्याकालीचरणसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल केल्याने नेटकऱ्यांवर संतापल्या रुपाली ठोंबरे, म्हणाल्या...

कालीचरणसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल केल्याने नेटकऱ्यांवर संतापल्या रुपाली ठोंबरे, म्हणाल्या…

कालीचरण महाराज आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच छत्तीसगडच्या रायपूरमधून त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. राजकीय नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचे कालीचरण महाराजांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे रुपाली पाटील यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

आता या टीकेवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या नेटकऱ्यांवर चांगल्याच संतापल्या आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, सोशल मीडियावरील वाचलगिरांनो हा कालीचरण बरोबरचा फोटो २ ते ३ महिन्यांपूर्वीचा आहे. तो अखिल मंडई म्हसोबामधील कार्यक्रमातील आहे. त्यावेळी अध्यात्मिक माणूस म्हणून फोटो काढला.

काही दिवसांपूर्वी या महाशयाने समाजात तेढ निर्माण होईल अशी भडकावू भाषणे केली आणि गुन्हा दाखल झाला. आता मी त्या कार्यक्रमात होते भेट झाली आणि कार्यक्रमातील फोटो आहे म्हणून निषेध करायचा नाही का? आणि मी फोटो डिलीट पण नाही केला, का करायचा चुकीला चुक ठेवायची मी ताकद ठेवते, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

समाज तेढ निर्माण करणाऱ्यांनी नीट लक्षात घ्या, ३ महिन्यांपूर्वी मला नव्हते कळाले की हा कालीचरण समाजात तेढ निर्माण करेल, तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, असे मला माहित असते तर मी त्याच्यासोबत फोटोच काढला नसता. त्यामुळे पोस्ट करुन तोतया गिरी करुन काही होणार नाही, असा टोलाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीकाकारांना लगावला आहे.

दरम्यान, महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कालीचरण महाराज यांना शुक्रवारी पुणे न्यायालयातून २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मात्र, या प्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. पुणे पोलीस कालीचरण महाराज यांना छत्तीसगडला परत पाठवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
खूप वर्षांनंतर धर्मेंद्रच्या घरी अचानक पोहोचली मुमताज, पहिली पत्नी ‘प्रकाश’ने केले जोरदार स्वागत
राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना बंदी; यापुढे करावा लागणार डिजिटल प्रचार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मोदींच्या रॅलीत घातपात करण्याचा डाव? पंजाबमधून तीन शार्प शुटर अटकेत, हॅन्ड ग्रेनेडही जप्त