Homeआरोग्यएम्सची स्थापना नेहरूंनी नाही तर या व्यक्तीने केली होती; त्यासाठी स्वत:ची जमीनही...

एम्सची स्थापना नेहरूंनी नाही तर या व्यक्तीने केली होती; त्यासाठी स्वत:ची जमीनही विकली होती

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) हा भारतातील सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांचा एक समूह आहे. या गटाकडे नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात जुनी AIIMS इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स आहे. त्याची पायाभरणी १९५३ मध्ये झाली आणि १९५६ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे स्वायत्त संस्था म्हणून त्याची निर्मिती झाली. एम्समध्ये पोहोचणे हे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. याची सुरुवात कशी झाली आणि कोणी सुरू केली हे तुम्हाला माहिती आहे का?

AIIMS चा पाया राजकुमारी अमृत कौर यांनी घातला होता. राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८७ मध्ये लखनौ मध्ये झाला त्या राजपरिवारतून होत्या. ती राजा ‘सर’ हरनाम सिंग अहलुवालिया यांची मुलगी होती. राजा हरनाम सिंग हे कपूरथलाच्या महाराजांचे धाकटे पुत्र होते. असे म्हणतात की गादीच्या वादामुळे राजा हरनाम सिंह कपूरथला सोडून लखनौला आले. ते अवधचा व्यवस्थापक झाले, जे आता अवध म्हणून ओळखले जातात. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

राजा हरनामचा विवाह बंगालच्या गोकुलनाथ चॅटर्जी यांची मुलगी प्रिसिला हिच्याशी झाला होता. त्यांना १० मुले होती आणि अमृत कौर ही सर्वात लहान आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती. अमृत कौरने तिचे शालीय शिक्षण हे इग्लंडमध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर त्या त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या. राजकुमारी अमृत कौर या भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्रीसुद्धा होत्या.

राजकुमारी अमृत कौरचे एम्स स्थापन करण्यामागचा एकच उद्देश्य होता आणि तेच त्यांचे स्वप्नसुद्धा होते म्हणून राजकुमारीने १८ फेब्रुवारी १९५६ रोजी लोकसभेत नवीन विधेयक मांडले आणि त्याच विधेयकाचे उदारहण आजतागत दिले जाते. अमृत कौर म्हणाल्या, “देशातील पदव्युत्तर शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणाचा उच्च दर्जा टिकवून ठेवण्यासाठी एका संस्थेची गरज आहे जी तरुणांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रशिक्षण देईल, हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे.

जी संस्था तरुणांना त्यांच्याच देशात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवृत्त करू शकेल. हे विधेयक लागू होण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच 1946 मध्ये भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणात अशा पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेची शिफारस करण्यात आली होती. या कल्पनेचे कौतुक होत असले तरी त्याच्या बांधकामातील रकमेमुळे चिंता वाढली होती. राजकुमारी अमृत कौर यांना एम्ससाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी १० वर्षे लागली आणि तो निधि गोळा करण्यासाठी त्यांना स्वतची जमीनसुद्धा विकवी लागली.

मे १९५६ मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला आणि त्यामुळे एम्सचा पाया घातला गेला. ६ फेब्रुवारी १९६४ रोजी नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी लग्नच केले नाही. त्यांचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास होता पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा अंतिम संस्कार शीख धर्मानुसार झाला.

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अमृत कौर यांची आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९५७ पर्यंत त्या या पदावर होत्या. आरोग्य मंत्रालयाव्यतिरिक्त, त्यांनी क्रीडा मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालयासारखे खातेही सांभाळले. एम्स व्यतिरिक्त, राजकुमारी अमृत कौर यांना पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेची पायाभरणी करण्याचे श्रेय देखील जाते.