सर्वच पक्षांनकडून निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. त्याच सोबत उमेदवारीसाठीची स्पर्धा देखील सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी काँग्रेसने आपली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मेरठमधील बिकिणी गर्ल म्हणून ओळख असणार्या अर्चना गौतम हिने बाजी मारली.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे आहे. त्यांनी आपले पहिले मोठे पाऊल टाकले आहे. कारण त्यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 125 पैकी 50 जागांची उमेदवारी महिलांना देण्यात आली आहे.
याच यादीत बिकिणी गर्ल अर्चना गौतम हिचे नाव आहे. या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्चना गौताम हिला मेरठमधील हस्तिनापुर येथून पक्षाचे तिकीट मिळाले आहे. प्रियंका गांधी यांनी विश्वास दाखवत 26 वर्षीय मॉडेल अर्चना गौतम हिला पक्षाचे तिकीट दिले.
अर्चना गौतम ही एक अभिनेत्री असून तिचे राजकारणात हे पहिलेच पाऊल आहे. नोव्हेंबर महिन्यात अर्चना गौतमने काँग्रेस पक्षात पहिल्यांदाच प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमांत ती सहभागी झाली. तिने उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिला.
याच सोबत ती सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत होती. यानंतर प्रियंका गांधी यांच्या विचारातून सुरू केलेली मोहीम ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ या मोहिमेत ती उत्साहाने सहभागी झाली. त्यामुळे असे बोलले जात आहे की, हस्तिनापुर मतदार संघात भाजपला काँग्रेसकडून तगडी झुंज मिळणार आहे.
अभिनेत्री अर्चना गौतम ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचे इनस्टाग्रामवर 7.28 लाख फॉलोवर्स आहेत. ती तिच्या इनस्टाग्रामवरील व्हिडीओ मुळे नेहमी चर्चेत असते. एवढेच नाही तर, तिने 2018 मधील इंडियाचा मिस बिकिणी गर्ल हा किताब देखील जिंकला आहे.
अर्चना तिच्या डान्स व्हिडीओमधून चाहत्यांना भुरळ पाडत असते. अर्चनाने अनेक जाहिराती केल्या आहेत. त्याच सोबत तिने 2015 मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एंट्री केली. त्यानंतर हसीना पारकर, बारात कंपनी, जंक्शन वाराणसी या चित्रपटांमध्ये ती दिसली. तिने अशा अनेक भूमिका साकारल्या. याशिवाय तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही तिने काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
पुजारा-रहाणेचा खेळ खल्लास, त्यांच्या जागी येणार ‘हे’ दोन फलंदाज, सुनील गावस्करांनी केले स्पष्ट
ब्रम्हचर्येचे पालन, ४१ दिवस जमिनीवर झोपला, नखे कापली नाही; ‘या’ मंदिराला भेट देण्यासाठी अजयचा व्रत
पुजारा-रहाणेमुळे युवा खेळाडूंना मिळेना संधी, संघातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी
महिलेच्या गाडीला फळवाल्याचा चुकून धक्का लागला; त्यानंतर महिलेने रागाच्या भरात जे केले ते पाहून संताप येईल