Homeताज्या बातम्यामहिलेच्या गाडीला फळवाल्याचा चुकून धक्का लागला; त्यानंतर महिलेने रागाच्या भरात जे केले...

महिलेच्या गाडीला फळवाल्याचा चुकून धक्का लागला; त्यानंतर महिलेने रागाच्या भरात जे केले ते पाहून संताप येईल

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक संतप्त महिला फळ विक्रेत्याच्या हातगाडीवरील पपई रस्त्यावर फेकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती फळ विक्रेत्याशी सतत वाद घालत असून पपई उचलून रस्त्यावर फेकताना दिसत आहे.

फळ विक्रेता तिची माफी मागतो आणि तिला थांबवण्याची विनंती करतो, पण महिला ऐकायला तयार होत नाही. रस्त्यावर त्यांचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या बाल्कनीत आले आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला जो आता ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइटवर व्हायरल झाला आहे.

या महिलेने तिची कार पार्किंगमधून बाहेर काढून रस्त्यावर उभी केली होती. गाडीच्या शेजारून एक फळविक्रेता हातगाडी घेऊन चालला होता. त्याचवेळी हातगाडी तिच्या कारला थोडीशी घासते आणि तिच्या कारवर छोटासा स्क्रॅच होतो. गाडीवरील स्क्रॅच पाहून महिलेचा राग सातव्या आसमानावर पोहोचला.

महिलेने आधी हातगाडीवाल्यावर आरडाओरडा केला आणि नंतर फळ विक्रेत्याच्या हातातील पपई फेकण्यास सुरुवात केली. संपूर्ण घटनेत फेरीवाला ‘मॅडम, असं करू नका, मी गरीब आहे’ अशी विनवणी करत राहिला पण महिला काहीही ऐकायला तयार नव्हती. सगळ्यांनी महिलेचा तमाशा पाहिला आणि तिचा व्हिडीओही काढला.

आता अनेक जणांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी त्या महिलेवर संताप व्यक्त केला आहे. तो फळविक्रेता महिलेला विनंती करत होता पण ती महिला ऐकायला तयारच नव्हती. फळविक्रेत्याने त्या महिलेला नुकसान झालेली भरपाई देण्याचेही मान्य केले होते मात्र, संतापलेल्या महिलेने न थांबता फळं फेकायला सुरूवात केली.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स म्हणत आहेत की एका गरीब हातगाडीतून 8-10 पपई रस्त्यावर फेकून महिलेने काय साध्य केले? फळविक्रेत्याच्या संयमाचे लोकांनीही कौतुक केले. तो या महिलेसारखा असता तर चित्र वेगळे दिसले असते. फेरीवाल्याचे किती नुकसान झाले आणि त्यांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे का? हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.