Homeखेळपुजारा-रहाणेचा खेळ खल्लास, त्यांच्या जागी येणार 'हे' दोन फलंदाज, सुनील गावस्करांनी केले...

पुजारा-रहाणेचा खेळ खल्लास, त्यांच्या जागी येणार ‘हे’ दोन फलंदाज, सुनील गावस्करांनी केले स्पष्ट

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी नुकतीच सलग कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या पुजारा आणि रहाणेच्या जागी 2 मोठी नावे सुचवली आहेत. पुजारा आणि रहाणे हे दोन्ही फलंदाज त्यांच्या खराब कामगिरीने निराश करत आलेली आहेत. अशा परिस्थितीत सुनील गावसकर यांनी त्यांच्या बदल्यात दोन फलंदाजांची नावे सांगितली आहेत.

खरे तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सध्याची कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघाचे निवडकर्ते पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळण्याची शक्यता जास्त आहे, असे माजी क्रिकेटपटूचे मत आहे. 25 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असेही सुनील गावस्कर यांचे म्हणणे आहे.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या अनेक कसोटी डावांमध्ये बॅटने फ्लॉप शो देत आहेत. पण, त्यानंतरही या दोघांना एकापाठोपाठ अनेक मोठ्या संधी दिल्या जात आहेत. मात्र तरीही, हे दोन्ही फलंदाज त्यांच्या खराब कामगिरीने निराश करत आहेत. केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही फलंदाजांनी संघाला मध्येच सोडले. पुजाराने 9 रन केले आणि रहाणेने केवळ 1 रन केला. त्यांच्या खराब कामगिरीनंतर या दोन्ही फलंदाजांची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे.

याबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू स्टार स्पोर्ट्सवरील लाईव्ह मॅचदरम्यान बोलताना कॉमेंट्रीमध्ये म्हणाले, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचे निवडकर्ते चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला वगळण्याची शक्यता आहे.

यासोबतच कसोटी संघात या दोन फलंदाजांची जागा घेऊ शकणार्‍या दोन फलंदाजांची नावेही त्यांनी सुचवली. यावर सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली की, भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हनुमा विहारी आणि पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी योग्य ठरतील.

विहारीबद्दल सांगायचे तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी श्रेयस अय्यरने पदार्पणासोबतच आपल्या फलंदाजीने लोकांना प्रभावित केले. आता,श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी खरच मिळणार का हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
ब्रम्हचर्येचे पालन, ४१ दिवस जमिनीवर झोपला, नखे कापली नाही; ‘या’ मंदिराला भेट देण्यासाठी अजयचा व्रत
मला माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे, करूणा मुंडेचा भाजपवर निशाणा
पुजारा-रहाणेमुळे युवा खेळाडूंना मिळेना संधी, संघातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी