Bus Accident : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; साखरझोपेतले प्रवासी किंकाळ्यांत जागे

 Bus Accident : अंबा घाटातील हा पहाटेचा थरकाप उडवणारा अपघात जणू मृत्यूची चाहूल घेऊनच आला होता. कामाच्या आशेने नेपाळहून निघालेल्या निष्पाप मजुरांची ही बस अचानक 70 ते 100 फूट दरीत कोसळली आणि सगळं काही एका क्षणात उलथून गेलं. अजून अंधार पसरलेला असतानाच पहाटे सुमारे पाच वाजता कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या अंबा घाटात ही भीषण घटना घडली. प्राथमिक … Read more

Bacchu Kadu : कोकणातील राजकारणात प्रहारची धडक! बच्चू कडूंची रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत एंट्री, निवडणूक आयोगावरही संतापाचा सूर

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 246 नगरपरिषदां आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजकारणात एक नवी हलचल झाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) … Read more

Nitesh Rane on Rohit Pawar : “रोहित पवार 2019 लाच भाजपातच येणार होते, ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत!”, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Nitesh Rane on Rohit Pawar : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. एका बाजूला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असतानाच, दुसऱ्या बाजूला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या विधानाने अजूनच राजकारण तापवले आहे. … Read more

election : रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीचाच डंका, सामंतांना धक्का देत मिळवला विजय, वाचा आकडेवारी

uday samant

election : वाड्या- वस्त्यांवर सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा गुलाल उधळला जातोय. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यात १६ तारखेला तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये १ हजार १६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे निकाल आज लागत आहेत. मात्र येणाऱ्या निकालांमधून शिंदे गटाला मोठा धक्का राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बसताना दिसत आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या स्वतःच्या गावातच महाविकास … Read more

ratnagiri : भास्कर जाधवांनी शिंदे-भाजपचा सुपडा केला साफ, रत्नागिरीच्या एकाही पंचायतीत भाजपला स्थान नाही

Bhaskar Jadhav

ratnagiri grampanchayat election result  | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे. या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. आता रत्नागिरी … Read more

रत्नागिरीत येणार भोंग्यांच्या आवाजांवर नियंत्रण, मुस्लीम बांधवांनी घेतला कौतूकास्पद निर्णय

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर राज्याचे वातावरण तापले होते. काही मुस्लिम संघटनाही याच्या विरोधात बोलत होत्या. (ratnagiri muslim desicion about mosque loudspeaker) अशात रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टिमचा वापर करुन … Read more

अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी समान नागरी कायद्याविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना, “लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही बहुमत झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील” असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या शंभर झाली आहे. त्यामुळे आता … Read more

धक्कादायक! अवघ्या सहा दिवसाच्या बाळाचा गळा आवळून ताम्हिणी घाटात फेकलं; घटनेनं शहर हादरलं..

अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला घाटात फेकण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेच्या ठिकाणी बाळाचा टॉवेल सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. सहा दिवस वय असलेल्या चिमुकल्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही धक्कादायक बातमी पुण्यातील घोटवडेमधून समोर आली आहे. अवघ्या सहा … Read more