पंजाबमधील रॅलीपेक्षा पीएम मोदींच्या पुनरागमनाचा भाजपला अधिक फायदा होईल का? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा मोठ्या निवडणूक रॅलींना संबोधित करतात. काल ते त्यासाठी पंजाबलाही पोहोचले होते. मात्र, त्याआधीच पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाली. त्यामुळे मध्यंतरी प्रवास रद्द करून त्यांना दिल्लीला यावे लागले. फिरोजपूर येथे होणारा मेळावाही रद्द करावा लागला. शेवटी, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक कोणाची होती, याबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. मात्र, भाजपने आपली संपूर्ण फौज … Read more

मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमधील भटिंडा दौऱ्यात गेले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी पंजाब सरकारकडून अहवाल मागितला आहे. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेवरून पंजाब सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. यादरम्यान आता सिनेसृष्टीतील कलाकारही या प्रकरणावर आपले मत मांडत आहेत. अभिनेत्री कंगना राणावत कोणत्याही मुद्यावर बिनधास्तपणे आपले म्हणणे मांडत असते. … Read more

पंजाबमधील घटनेची राष्ट्रपतींनीही घेतली दखल, पंजाब सरकारवर कडक कारवाई होणार?

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जेथे ते फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे दौरा न करताच त्यांना परतावे लागले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही … Read more

“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमध्ये रॅली होणार होती. यापूर्वीही त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिली. पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकला होता. सुरक्षा पाहून त्यांचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. त्यामुळे पंतप्रधानांना पूर्वनियोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहता आले नाही. गृहमंत्रालयाने चन्नी सरकारकडून अहवाल मागवला आहे. मात्र, पंजाब सरकारने याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याला … Read more

शौर्याची भाषा करणारे गप्प का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का? प्रसिद्ध गायकाची मोदींवर टीका

गलवान खोऱ्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चीनी सैनिक गलवानच्या खोऱ्यात चीनी ध्वज फडकावताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमुळे केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. यादरम्यान बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. विशाल ददलानी यांनी ट्विटर … Read more

पंतप्रधान मोदींच्या मेट्रो राईडवर नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स, वाचून पोट धरून हसाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 28 डिसेंबर रोजी कानपूरला पोहोचले. येथे त्यांनी एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. त्यांनी आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली आणि बीना-पंकी बहुउत्पादन पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि नव्याने सुरू झालेल्या कानपूर मेट्रोमध्ये प्रवासही केला. हे सर्व ठीक होते, पण यादरम्यान पीएम मोदींच्या फोटोमध्ये असे काही दिसले जे लोकांना समजू शकले नाही. … Read more