Homeताज्या बातम्यापंजाबमधील घटनेची राष्ट्रपतींनीही घेतली दखल, पंजाब सरकारवर कडक कारवाई होणार?

पंजाबमधील घटनेची राष्ट्रपतींनीही घेतली दखल, पंजाब सरकारवर कडक कारवाई होणार?

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जेथे ते फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे दौरा न करताच त्यांना परतावे लागले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी या संदर्भात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. त्याचवेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही या प्रकरणावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करून, उपराष्ट्रपती म्हणाले की, सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत असणारा फोटो सध्या ट्विटरवर प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये लिहिले, “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमधील त्यांच्या ताफ्यातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल विचारपूस केली. या गंभीर त्रुटीबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली.”

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबतचा वाद अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा म्हणाले की, भारतातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. जनता दल (धर्मनिरपेक्ष) च्या ज्येष्ठ नेत्यानेही भूतकाळातून शिकण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून या हलगर्जीपणाचा अहवाल मागवला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर परतावे लागले याचे मला वाईट वाटते. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणण्यासाठी मला भटिंडा येथे जायचे होते, पण माझ्यासोबत आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे मी पंतप्रधानांना आणायला गेलो नाही. पण सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. दौरा रद्द करण्याचा निर्णय अंतिम क्षणी झाला, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलेले आहे.

बुधवारी पंजाबच्या मतदान केंद्राच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत “गंभीर त्रुटी” झाल्याची घटना घडली होती, जेव्हा काही आंदोलकांनी फिरोजपूरमधील रस्ता अडवला होता ज्यावरून ते जाणार होते. यामुळे पंतप्रधान २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. या घटनेनंतर पंतप्रधान दिल्लीला परतले. ते कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत किंवा दोन वर्षांनंतर राज्यातील पहिल्या सभेला ते संबोधित करू शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
‘बिग बाॅस’ मधील जय-मीराकडे बड्या प्रोजेक्ट्सची रांग; आनंद शिंदेंच्या नव्या गाण्यात झळकणार जोडी?
सख्ख्या भावाशीच जोडले गेले होते अभिनेत्रीचे नाव; रडून रडून झाली होती भयंकर अवस्था
भाजपाला मोठा धक्का! केंद्रीय मंत्र्यासह ९ आमदार पक्ष सोडणार

ताज्या बातम्या