Homeताज्या बातम्यामोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…

मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमधील भटिंडा दौऱ्यात गेले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी पंजाब सरकारकडून अहवाल मागितला आहे. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेवरून पंजाब सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. यादरम्यान आता सिनेसृष्टीतील कलाकारही या प्रकरणावर आपले मत मांडत आहेत.

अभिनेत्री कंगना राणावत कोणत्याही मुद्यावर बिनधास्तपणे आपले म्हणणे मांडत असते. तो जणू सिनेसृष्टीतील असो किंवा सामाजिक मुद्दा. कंगना नेहमी तिचे मत मांडत असते. आताही कंगनाने पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये तिने लिहिले की, ‘पंजाबमध्ये जे झालं ते लज्जास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेता आहेत आणि १४० कोटी जनतेचा आवाज आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला होणे म्हणजे प्रत्येक देशवासीयांवर हल्ला होणे आहे. तसेच हे आपल्या लोकशाहीवर हल्ला होण्यासारखे आहे’.

तिने पुढे लिहिले की, ‘पंजाब दहशतवादी कारवायांचं केंद्र बनत आहे. जर आपण त्यास थांबवलं नाही तर पुढे जाऊन देशाला मोठं नुकसान सोसावं लागेल. यासोबत कंगनाने या पोस्टमध्ये #BharatStandWithModiJi’ हा हॅशटॅगही वापरत पंतप्रधान मोदी यांचं समर्थन केलं आहे’.

कंगनाशिवाय अभिनेता अनुपम खेर, परेश रावल तसेच अभिनेत्री किरण खेर यांनीही ट्विट करत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेबाबत जो काही गोंधळ झाला तो पंजाब पोलीस आणि सरकारसाठी खेददायक आणि लज्जास्पद आहे’.

‘या प्रकरणात देशाच्या पंतप्रधानांप्रती काही लोकांचे द्वेष म्हणजे त्यांच्या भ्याडपणाचे लक्षण आहे. यासोबत त्यांनी हिंदीतील एक वाक्प्रचारही दिला आहे की, जाको राखे साइयां, मार सके ना कोय म्हणजेच अशा व्यक्तीवर कोणतीही संकटे आली तरी ते त्याचे काहीच करू शकत नाही’.

परेश रावल यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आगीशी खेळ. आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेमधील अक्षम्य आणि धक्कादायक त्रुटी नक्कीच अस्वीकार्य आहेत. हे सांगण्याची काही गरज नाही पण ते अधिक शक्तीशाली, अधिक प्रेमळ आणि दृढनिश्चयाने उदयास येतील’.

किरण खेर यांनी लिहिले की, ‘आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेबाबत पंजाब सरकारच्या त्रुटी नक्कीच धक्कादायक आहेत. या चुकीचा आम्ही निषेध करतो आणि त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे’.

महत्त्वाच्या बातम्या : 

ओमिक्रोनचा गेम ओव्हर? भारतात तयार झालेल्या ‘या’ औषधाने ओमिक्रोनावर करता येईल मात

११ वर्षांपूर्वी शेंगा विकणाऱ्याने फुकटात दिल्या होत्या शेंगा, भावा-बहिणीने अमेरिकेतून येऊन फेडले कर्ज

“सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावताय, ते आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा करताय”