एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (swapnil galdhar criticize gunratna sadavarte)
याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राजकारणातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अशात एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सदावर्तेंच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला भाजप तालुकाध्यक्षांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
बीडचे भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते हा समाज विघातक माणूस असून त्याच्या तोंडाळा काळं फासणाऱ्यालाहा पन्नास हजारांचं बक्षीस देण्यात येईल, असे स्वप्नील गलधर यांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्ते हा दोन समाजात आणि जातींमध्ये तेढ निर्माण करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा. याबाबतची तक्रार बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे दिली आहे. या तक्रारीवर कारवाई न केल्यास जो कोणी सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासेल, त्याला ५० हजार रुपये देण्यात येईल, असे स्वप्नील गलधर यांनी म्हटले आहे.
तसेच याप्रकरणी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाचे नाव सच्चिदानंद पुरी असे आहे. सच्चिदानंद हा गुणरत्न सदावर्ते यांच्या जवळचा व्यक्ती आहे. तोच एसटी कर्मचाऱ्यांना गुणरत्न सदावर्तेंचा निरोप पोहचवायचा. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटात पुरी हा सामील असल्याचे तपासात समोर आले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल होताना दिसून येत आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनाला चिथावणी दिल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. तसेच मुंबईनंतर, अकोला, सातारा आणि कोल्हापूर येथेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा पोलिस तर सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंनी ज्यांचा किस्सा सांगीतला ते सलीममामा शेख नेमके आहेत तरी कोण? वाचा….
‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; नौदलप्रमुखांचा इशारा
आई गुरूद्वारात करायची ‘हे’ काम, ऋषभ लंगरमध्ये करायचा जेवण, राहायला नव्हते घर; वाचून व्हाल भावूक