स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या राज्यासह पुर्ण आजूबाजूच्या राज्यामध्येही आहे. त्यांच्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सोशल मिडीयावर त्यांचे भक्त व्हिडीओ आणि स्वामी समर्थांचे फोटो शेअर करत असतात. देशभरात स्वामी समर्थांची अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत.
अशाच एका प्रसिद्ध देवस्थानातला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या मंदिरामध्ये सगळे लोकं स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत. कोणी भजन म्हणतंय तर कोणी पोथी वाचतंय. पुर्ण मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण आहे.
बरेच जण डोळे मिटून स्वामी समर्थांकडे आपल्या जीवनातील दुख व्यक्त करताना दिसत आहेत तर कोणी स्वामी समर्थांपुढे आपल्या इच्छा आकांशा व्यक्त करताना दिसत आहे. पुर्ण मंदिरात भक्तांची गर्दी जमली आहे. पण अचानक एक व्यक्ती मंदिरात येते. ही व्यक्ती हुबेहुब स्वामी समर्थांसारखी दिसत आहे.
त्यांना पाहून भक्त अवाक झाले आहेत. कारण तो व्यक्ती हुबेहुब स्वामी समर्थांसारखा दिसत आहे. काही भक्त त्यांना गर्दीतून वाट काढून देत आहेत. अनेक भाविक त्यांना पाहून पाहताच क्षणी पाया पडत आहेत. काही जण त्यांना थेट उठून उभे राहिले आहेत.
याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अक्कलकोट येथील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी श्री स्वामी समर्थ अशा कमेंट्स केल्या आहेत. हा व्यक्ती स्वामी समर्थांच्या रुपात पुर्ण मंदिरात फिरत आहे.
या व्यक्तीचा व्हिडीओ कोणी काढला आणि हा व्यक्ती कोण आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला हजारोंच्या संख्येने व्ह्युज आले आहेत. अनेक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
https://www.facebook.com/travelMonksateesh/videos/545693574158354/
महत्वाच्या बातम्या
‘किलोनी सोने, कोट्यावधींची कॅश’; रेल्वे अधिकाऱ्याकडे सापडले करोडोंचे घबाड, पाहून CBI लाही फुटला घाम
निवडणूक आयोगाने काय त्यांच्या कानात…; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांना झाप झाप झापले
कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु
कुत्र्यापासून वाचला पण.., डिलीव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल