शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भाजप आणि शिंदे गटावर चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी शिंदे गटाबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. निवडणूक आयोग आणि शिंदे गट यांच्यात साठ गाठ झाली आहे का? असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.
शिंदे गट म्हणतंय की पक्ष प्रमुखच बेकायदेशीर आहे. मान्यता आम्हालाच मिळणार. निवडणूक आयोग काय घरचा आहे का? की निवडणूक आयोगाने त्यांच्या कानात असं सांगितलंय? असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे बीड दौऱ्यावर आहे. यावेळी एका पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी असे वक्तव्य केले आहे.
सुषमा अंधारे यांनी यावेळी सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या जवळकीवरही भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहे, हे धोक्याचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
आमची खरी शिवसेना नाही, आमचे जिल्हाप्रमुख खरे नाहीत. आम्हाला आमची वस्तुस्थिती माहिती आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. हे लोक कॉप्या करुन पास झालेले आहे. त्यामुळे त्यांना खरं माहिती नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
४० आमदार जे गेले आहेत, ते आमच्याच पक्षातून निवडणूक लढवून गेले आहे. त्यांच्या फॉर्मवर सुभाष देसाई, निलम गोरे, संजय राऊत यांनीच सह्या केल्या आहेत. मग ते खरे शिवसैनिक नाहीत का? असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे.
तसेच महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, समारोपाची मोठी सभा ही मुंबईत होणार आहे. त्या सभेला उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महाविकास आघाडीतील नेते उपस्थित असणार आहे. ठाकरे गटाच्या ८ मोठ्या सभा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
गुगलने २८ वर्षांसाठी नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा, महिन्याचं भाडं ऐकून चक्रावून जाल
शिंदे गटातील बड्या नेत्याचा ५०० कोटींचा घोटाळा; जावयासह सासऱ्यांनाही बेड्या पडणार
शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाठवले स्वताचे नग्न फोटो, नंतर मुलांनी केलं असं काही की प्राचार्यालाही..