Share

परीक्षेचा दिवशीच झाला वडीलांचा मृत्यू; डोळ्यांतील अश्रू दाबून धरत प्राचीने सोडवला दहावीचा पेपर

लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम येथिल रहिवासी राधेशाम सोंदरकर यांच्या अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अन् मुलगी दहावीला. दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलींना घेतला आणि इंग्रजीचा पेपर दिलाही.

मुलीने घेतलेला हा निर्णय ऐकून अनेकांचे डोळे भरून आले. राधेश्याम सोंदरकर यांचा मागील महिन्यात शिवरात्री दिवशी अपघात झाला होता. लाखांदूरवरून राधेश्याम हे स्वागावी सोनाकडे ते जात होते. त्यावेळ मेंढा फाट्याजवळ चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली.

प्रकृती चिंताजनक असल्यामुळे राधेश्याम यांना नागपूर येथील दवाखान्यातमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी दहावीत शिकत आहे. तर लहान मुलगी सातवीत आहे. सकाळी ६ वाजता फोन आल्यानंतर प्राचीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशी बातमी कुटुंबीयांना मिळाली.

त्यांची मोठी मुलगी प्राची (prachi)  राधेश्याम सोंदरकर यंदा दहावीचला आहे. त्यात तिचे पेपर सुरू आहेत. वडीलांच्या मृत्यूची बातमी ऐकून प्राची खचून गेली. त्यावेळी तिला नातेवाईकांनी पेपरला जाण्यासाठी तयार केले. तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. त्यानंतर घरासमोर बघता बघता प्रचंड गर्दी झाली. शेजारी एकवटले, गाव गोळा झाला. परिसरात शोकाकुल वातावरण पसरले. मात्र प्राचीने यावेळी धाडसी निर्णय घेतला.

“पोरी, अभ्यास कर, उच्च शिक्षण घेऊन पुढे जा, खूप मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी रहा” हे वडिलांचे शब्द आठवत प्राचीने पेपर देण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ ते २ या वेळेत तिने इंग्रजीचा पेपर सोडवला. घरात वडिलांचा मृतदेह असताना मनात आठवण साठवून प्राचीने पेपर दिला. यावेळी मुख्याध्यापक प्रा, दामोधर सिंगाडे यांनी देखील प्राचीला धीर देण्याचे काम करत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

वडिलांच्या मृत्यूचे दुःख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठण्याचा काम प्राचीन केलं. तिने आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज वडसा येथील १९३९ या परीक्षा केंद्रात प्राचीन पेपर दिला. दुहेरी संकटात सापडलेल्या प्राचीने आयुष्यातील ही कठीण परीक्षा दिली. त्यामुळे अनेकांची डोळे भरून आले. अनेक लोकांनी तिच्या ध्येयाचे कौतुकही केले. तर प्राचीच्या या धाडसी निर्णयाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या
राजकीय भूकंप! राष्ट्रवादीची भाजपसोबत हातमिळवणी, राज्याच्या सरकारमध्येही सामील होणार
बच्चू कडूंचे दिवस फिरले! ‘या’ गुन्ह्यात कोर्टाने ठोठावली दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..

ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now