राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच नाव राजकारण (politics) आदराने घेतलं जातं. पण अनेकदा शरद पवार वादाच्या भोवर्या अडकत असतात. नुकतेच १० मार्चला शरद पवार पारनेर दौरा (Parner Tour) करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पवार यांच्या या दौर्याला पारनेर कारखाना (Parner Factory) बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे.
१० मार्चला पारनेर तालुक्यातील जवळा व निघोज येथे भुमिपुजन, उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार येणार होते. पण पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने विरोध केल्यामुळे आता पवार यांच्या दौर्यावर शंका निर्माण झाली आहे.
शरद पवार यांच्या पारनेर तालुक्यातील दौर्यावेळी ‘शरद पवार गो-बॅक’ असे म्हणत समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. यादरम्यान, राज्यातील सुमारे ५० सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्यात पवार यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यादरम्यान, आता शरद पवार यांना पारनेर बचाव समितीने एक पत्र लिहीले आहे. या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत २५ प्रश्न विचारण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा खरच कळवळा येत असेल तर या प्रश्नाची उत्तरं पवार यांनी पारनेर दौर्यात द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पवार यांना यापुढे पारनेर तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी या प्रश्नाची उत्तरे न दिल्यास त्यांच्या दौर्यावेळी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल, असा इशारा समितीकडून देण्यात आला आहे. शरद पवार यांचा कार्यक्षेत्रातील बागायती भागात पहिलाच दौरा आहे. आयोजकांची या दौर्याला जाण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र, आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पोलिस, आयोजक व पशासनाची प्रचंड डोकेदुखी वाढणार आहे. यादरम्यान, पारनेर साखर कारखान्याची भ्रष्ट मार्गाने विक्री करुन शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले तो बळकावला, असेही म्हटले जाते आहे. तसेच यासाठी पवारांनी त्यांना मदत केली असल्याचा पुरावा देखील समितीकडे आहे असे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन् केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी
वारं फिरलं! कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले ४५ नेते पुन्हा घरवापसी करणार; अजितदादांचा गौप्यस्फ
अख्ख्या मंत्रिमंडळाने प्रचार करूनही कसब्यात भाजप का हरली? कार्यकर्त्यांनी ‘या’ नेत्यांवर फोडले खापर