आताच्या काळात दलितांवर होणारे अत्याचार आणि त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक कमी होताना दिसून येत आहे. तसेच अशा घटना होत असल्यास त्याच्यावर आवाजही उठवला जात आहे. पण असे असताना आता भाजपच्या एका खासदाराने धक्कादायक वक्तव्य केले आहे. (sudhakar shringare shocking statement)
मी दलित असल्यामुळे मला सापत्न वागणूक मिळत आहे, असे खळबळजनक वक्तव्य लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सुधाकर श्रृंगारे यांनी हे विधान विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर केले आहे.
माझ्या कामाचे श्रेय प्रस्थापित घेतात. अधिकारी शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण ही देत नाही. केलेल्या कामाचे श्रेय तर मिळतच नाही. प्रस्थापित ते श्रेय मिळून देत नाही. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांमध्ये सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. मी दलित असल्यामुळे अधिकारी माझे ऐकत नाही, असे सुधाकर श्रृंगारे यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर स्टॅच्यु ऑफ नॉलेज या ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सुधाकर श्रृंगारे यांनी प्रास्ताविक केले होते. त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली होती.
७० फूट उंच या प्रकृतीचे काम सुरु करण्यात आल्यानंतर दोनच दिवसात हे काम महानगर पालिकेच्या माध्यमातून बंद पाडल्याचे त्यांनी सांगितले. मागील चार वर्षांपासून खासदार असलो तरी येथील प्रशासनाच्या वतीने मला कधी सन्मानाने बोलावले जात नाही. मला निमंत्रण दिले जात नाही, असे सुधाकर श्रृंगारे यांनी म्हटले आहे.
तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना लातूरमध्ये राबवण्यात आल्या होत्या. त्या योजनेचे उद्धाटन किंवा लोकार्पण असेल तर त्याही कार्यक्रमांना लातूरचे जिल्हाधिकारी हे खासदार म्हणून मला निमंत्रण देत नाही. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाखाली ते काम करतात. माझ्यासारख्या दलित समाजातून आलेल्या खासदाराला डावललं जातं, माझ्यावर अन्याय केला जातो, असा थेट आरोपही श्रृंगारे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ
पंडितांनो, काश्मिर सोडा नाहीतर मारले जाल, अग्निहोत्रींनी शेअर केले धक्कादायक पत्र, म्हणाले…
मेरे पिया गये रंगून: बॉलिवूडच्या पहिल्या गायिका शमशाद बेगम यांची कहाणी वाचून भारावून जाल