Share

subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”

Eknath Shinde Devendra Fadanvis

subramanyam swami on bjp shinde government | काही महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले आहे. या सरकारवर विरोधी पक्षनेते वारंवार टीका करताना दिसून येत आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. पण स्थानिक नेत्यांकडून याला विरोध होत आहे. अशात काही नेत्यांनी याप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेतली होती.

सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक नेते करत आहे. नेत्यांच्या भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. हे सरकार अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकार हे शिवसेना तोडून बनवण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून निवडून आलेले नाही. त्यामुळे हे सरकार अनैतिक आहे. त्यांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरचे कॉरिडॉर होणार नाही. फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही. पंढरपुरात आज विमानतळ नाही. येथील रोड चांगले नाही. चंद्रभागा नदीचे पाणी घाण झाले आहे. ते साफ केले पाहिजे. कॉरिडॉराठी मंदिरं, दुकाने तोडण्यात येतील हे चुकीचे आहे, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

तसेच मंदिरे ताब्यात घेण्यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणाचेच ऐकत नसून ते हिंदुत्ववादी नाही. त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहे. ज्यांना वाटतं मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदीचे चमचे आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूने हिरावला बांगलादेशच्या तोंडातला विजयाचा घास; भारताला जिंकून दिली हरलेली मॅच
ऑक्सिजन संपले, मृतदेहांचे ढीग पडले, चीनमधील ‘हा’ व्हायरल व्हिडिओ तुमची झोप उडवेल
कसोटी मालिका जिंकत भारताने घेतला बांगलादेशचा बदला; ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now