BJP | माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाबाबत भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथील पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला सावध केले आहे.
देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि चीनच्या सीमेवरील भूभागाचे नुकसान पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजपचा विजय अवघड असल्याचेही ते म्हणाले. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, जर असं झालं तर भाजपने इशारा म्हणून याची दखल घेतली पाहिजे.
अर्थव्यवस्थेची पडझड आणि चीनच्या सीमेवरचा प्रदेश गमावल्याने 2024 च्या निवडणुकीत भाजपचे नुकसान होईल. या ट्विटसोबत त्यांनी एक यूट्यूब व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्याच बालेकिल्ल्यात झालेला पराभव हा भाजपसाठी इशारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांसारख्या भाजपच्या दिग्गजांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरातून शून्य जागा मिळणे ही मोठी बातमी आहे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाला आहे, त्यामुळे पोस्टमार्टम करून सुधारणेकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
नागपूर जिल्ह्या हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. याशिवाय, नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही आहे. पंचायत समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
पंचायत समितीच्या बहुतांश जागा काँग्रेसने काबीज केल्या आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीचे एकही सभापतीपद भाजपला जिंकता आले नाही आणि उपाध्यक्षपदाच्या केवळ तीन जागा भाजपच्या खात्यात आल्या, हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने अध्यक्षपदाच्या 13 पैकी नऊ आणि उपाध्यक्षपदाच्या 13 पैकी 8 पदे जिंकली आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने तीन अध्यक्षपदे, तर शिवसेनेने एक अध्यक्षपद जिंकले आहे. महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
shivsena : पुन्हा दगा! उद्धव ठाकरेंच्या ‘या’ लढाऊ वाघिनीचे थेट ठाकरेंवरच खळबळजनक आरोप, शिवसेनेत खळबळ
ED : दुसऱ्या आरोपींना चहा प्यायला नेतात, ते डबे खातात, मग संजय राऊत…; कोर्ट ईडीच्या वकीलांवर भडकले
Tipu Sultan : दर दिवाळीला ‘या’ गावात पाळला जातो दुखवटा, साजरी केली जाते काळी दिवाळी, वाचून आश्चर्य वाटेल
IND Vs PAK : वर्ल्डकपचा भारत-पाकिस्तानचा सामना तुम्हीही पाहू शकता फुकटात, फक्त वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक