संपूर्ण देशाने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सामान्य क्रिकेट चाहत्यांपासून ते मोठ्या क्रिकेटपटूंपर्यंत आणि आयपीएलच्या सर्व संघांनी धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या, पण भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने त्याला अशा शुभेच्छा की सगळेजण आता श्रीसंतला ट्रोल करत आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीला गोलंदाजी करताना दिसत आहे.
आयपीएलमध्ये पंजाबसाठी गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रीशांत धोनीला यॉर्कर बॉल टाकल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहे. श्रीशांतच्या कॅप्शनवरून सर्वकाही समजत असले तरी, माझ्या मोठ्या भावाला म्हणजे धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे लिहिले आहे. पुढे त्याने लिहीले की, त्याने मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. लव्ह यू ब्रो, माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडूवर मी तुझी विकेट मिळवली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
श्रीसंतची ही शैली चाहत्यांना समजली नाही. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की ह्या कसल्या शुभेच्छा आहेत? दुसर्या यूजरने लिहिले की ही होती विश ऑफ द डे. एका यूजरने लिहिले की, भाई स्वताला विश केले आहे की धोनीला? एका चाहत्याने लिहिले, कोण भावाचे असे अभिनंदन करतो? श्रीसंंतची चांगलीच शाळा चाहत्यांनी घेतली आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कोहलीने अनेक प्रसंगी धोनीला मोठा भाऊ म्हटले आहे. आज धोनी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि यादरम्यान कोहलीने त्याचा मोठा भाऊ धोनीसाठी एक खास पोस्ट लिहीली आहे.
भारतीय संघाची जर्सी आणि इंडियन प्रीमियर लीग जर्सीमधील धोनीसोबतचे दोन फोटो शेअर करताना कोहलीने लिहिले आहे की, असा लीडर ज्याच्यासारखा कोणीच नाही. तु भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त आहेस. फक्त तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्किप.
2008 मध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीने अनेक सामने खेळले आहेत. धोनीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तोपर्यंत त्याने कोहलीला कर्णधारपदासाठी तयार केले होते.
धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली त्याला खूप मदत केल्याचेही कोहलीने कबूल केले आहे. मर्यादित षटकांचे कर्णधारपद मिळाल्यानंतरही सामन्यादरम्यान कोहली मैदानावर सतत धोनीकडून टिप्स घेत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले. कर्णधार म्हणून धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय उत्तम होती.
महत्वाच्या बातम्या
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…
मला दिपीकासोबत ‘तसे’ सीन्स करायचेत, इमरान हाश्मीच्या वक्तव्याने सगळेच हैराण
फडणवीसांना फ्रिहॅन्ड देण्याच्या मुडमध्ये नाहीये हायकमांड, मंत्रिमंडळात जास्त हस्तक्षेप करता येणार नाही
भारताचा जगभरात डंका! भारतीय वंशाचा ‘हा’ व्यक्ती होऊ शकतो ब्रिटनचा नवा पंतप्रधान, वाचा त्याच्याबद्दल..