तुम्ही अनेकदा महापुरुषांचे पुतळे पाहिले असतील त्यांचे स्मारक बांधलेले पाहिले असतील. पण सोलापूरमध्ये मुलांनी वडीलांच्या निधनानंतर ते कायम आठवणीत राहावे म्हणून त्यांचे स्मारक बांधले आहे. मुलांनी असे करुन समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांढरी गावात हे स्मारक आहे. मोहन घावटे हे शेतकरी होते. त्यांना पंचक्रोशीत मदतीला धावून जाणारे आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जायचे. बार्शी बाजार समितीवर त्यांनी संचालक म्हणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्वही केले होते.
मोहन घावटे यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा गणेश घावटे आणि भावांनी मिळून मोहन घावटे यांचे स्मारक बांधले आहे. आपले वडील हे कायम आठवणीत राहावे यासाठी मुलांनी हे स्मारक बांधत समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे
मोहन घावटे यांच्या निधनानंतर घावटे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. कारण कुटुंबात ते सर्वांना जीव लावत होते. मोहन घावटेंच्या वडिलांनी त्यांना पाच एकर जमीन दिली होती. त्यावेळी नोकरी नव्हती काहीही नव्हतं. पण कष्ट करुन ती पाच एकर जमीन मोहन घावटे आणि त्यांच्या भावाने मिळून ९० एकरची बनवली. मुलांना कोणत्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून ते कायम धडपड करायचे.
आता मोहन घावटे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचे स्मारक बांधले आहे. यावर बोलताना गणेश घावटे म्हणाले की, आम्ही या स्मारकाला मंदीर म्हणतो. जसे लोक दररोज मंदीरात जाऊन पूजा करतात. तशीच मी आणि आमच्या कुटुंबातील सदस्य रोज या स्मारकाजवळ येतात. इथे आम्ही येऊन रोज वडीलांच्या पाया पडतो, त्यांचे दर्शन घेतो.
वडील आम्हाला खुप जीव लावायचे. पण कोरोना काळात त्यांचे निधन झाले. एखादा माणूस जेव्हा जातो, तेव्हा त्याच्या मागे फक्त आठवणीच उरतात. त्यामुळे आम्ही हे स्मारक बांधले आहे. आपले आईवडील हे आपल्यासाठी खुप कष्ट घेत असतात. त्यामुळे आपण त्यांची नेहमी सेवा केली पाहिजे, असेही गणेश घावटे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुस्लिम मुलाशी लग्न केलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अटक; लावले ‘हे’ गंभीर आरोप
रामदास कदमांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा मोठा डाव; राष्ट्रवादीचा ‘हा’ मोहरा शिवसेनेत
दोनशे तोळं सोनं, 3 किलो चांदीची चोरी, पुणे पोलीस शेतकरी वेशात गावात राहीलं मुक्कामी, शेवटी मात्र…