एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहे. ४० आमदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना पर्याय शोधत आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जर ते ठाकरे गटात आले तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना धक्का देण्यासाठीच ठाकरे गट ही रणनिती आखत असल्याचे म्हटले जात आहे.
दापोली विधानसभा मतदार संघात माजी मंत्री रामदास कदम यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु होते. याच पार्श्वभूमीवर आता संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम ठाकरे गटात आले तर ठाकरे गटासाठी दापोली विधानसभा मतदार संघात ते महत्वाचे ठरतील.
पुढच्या १५ दिवसांमध्ये संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. संजय कदम यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वत: उद्धव ठाकरेही उपस्थित असणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
उद्धव ठाकरे संजय कदमांना ठाकरे गटात घेणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यांना उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आता ते राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसांत ते हाताला शिवबंधन बांधणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार हे शिंदेंसोबत गेले होते. पण आता संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार असल्यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरीत पुन्हा बळ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल
हिंदुत्ववादाचा डंका वाजवणाऱ्या फडणवीसांच्या पत्नीला हे शोभते का ? ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
दोनशे तोळं सोनं, 3 किलो चांदीची चोरी, पुणे पोलीस शेतकरी वेशात गावात राहीलं मुक्कामी, शेवटी मात्र…