पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एक चोरी झाली होती. त्यामध्ये चोरांनी घरातून तब्बल २ किलो सोने चोरी केले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी एक शक्कल लढवत चोरांना पकडलं आहे. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला चोरांनी ज्या पद्धतीने ही चोरी केली आहे ते ऐकून पोलिसही हैराण झाले आहे. ही चोरी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सिंध सोसायटीत झाली होती.
सोसायटीतील एका कुटुंबाशी चांगली ओळख निर्माण करुन दोन महिलांनी २०० तोळे सोने आणि ३ किलो चांदीची चोरी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी बीड-जालनाच्या जवळ असलेल्या एका गावातून त्या महिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी महिलांकडून ८० तोळे सोने, दीड किलो चांदी आणि इतर वस्तु असा ४३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ज्या सराफांकडे महिलांनी हे दागिने विकले होते. त्या दोन सराफांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
चोरी करणाऱ्या महिलांना पकडण्यासाठी पोलिसांनीही अजब शक्कल लढवली होती. महिलांना पकडण्यासाठी पोलिस शेतकऱ्यांच्या वेशात गावात गेले होते. तिथे ते तीन दिवस तसेच राहिले होते. ते चोरट्यांवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर त्यांनी त्या महिलांना पकडले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी खुशबू गुप्ता, अनू आव्हाड या सराफांना अटक केली आहे. तसेच चोरी करणाऱ्या महिला पुजा गुप्ता आणि रितू भोसले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्या आधी भिकाऱ्याचा वेश घालून घराच्या आजूबाजूची चाचपणी करायच्या त्यानंतर ओळख वाढवून घरात घुसून त्या चोरी करायच्या.
महत्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांनी रियाझ अलीला वर्षा बंगल्यावर बोलावले अन् त्याच्यासोबत…; व्हिडीओ तुफान व्हायरल
हिंदू धर्मावरील मुलीच्या श्रद्धने जिंकली लोकांची मने; गाडीत कुत्र्याऐवजी फिरवते गायीचे वासरू
थोरल्या भावाचं लग्न जमत नव्हतं म्हणून धाकट्याने आधीच केलं लग्न; अपमानामुळे संतप्त थोरल्याने धाकट्याला मारून टाकलं