Share

काळीज पिळवटून टाकणारा योगायोग; ७ वर्षांपूर्वी जिथे आईचा प्राण गेला तिथेच मुलानेही सोडला जीव, लोकं म्हणाली..

अलीकडेच्या काळात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात कारचा चुरा झाला आहे. शुक्रवारी रात्री पावणे दोन वाजता हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सोहम निरज नवले (वय १७) याचा मृत्यू झाला आहे. सोहम इस्सार पेट्रोल पंपाजवळील गजानन मंदिराच्या परिसरातील रहिवासी आहे.  सोहम नवलेची (Soham Navale) नुकतीच दहावीची परीक्षा सुरू होती.

दहावीचा बोर्डाचा पहिला पेपर गुरुवारी सोहमने दिला. रात्री तो वडिल आणि बहिणी सोबत कॅनाॅट परिसरात आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर रात्री अकरा वाजता सोहम वडील आणि बहिणी सोबत घरी आला. त्यानंतर  तिघेही झोपी गेले.

त्यानंतर मध्यरात्री अचानक सोहमला जाग आली. त्यावेळी त्याने वडिलांच्या कारची चावी घेतली आणि बाहेर फिरायला गेला. रात्रीच्या वेळी सोहमच्या वडिलांना अचानक जाग आली तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी निरज नवले यांनी सोहमच्या खोलीत जाऊन पाहिले तर सोहम खोलीत दिसला नाही.

भरदार वेगाने कार चालवत असताना अचानक एसएफएस शाळेसमोरील दुभाजकाला सोहमची गाडी जोरदार धडकली. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

तसचे सोहमला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोहमचा मृत्यू झाला. याप्रकरणी जीन्स पोलीस ठाण्यात अपघाताची नोंदणी करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले.

यादरम्यान विशेष म्हणजे घरचे झोपल्यानंतर मुलगा रात्री कुठे निघाला होता? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. त्याच ठिकाणी सात वर्षांपूर्वी सोहमची आई वर्षा नवले यांचा भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. आई आणि मुलाचा एकाच ठिकाणी अपघात झाल्यामुळे या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

सुप्रीया सुळेंनी मटन खाऊन घेतले महादेवाचे दर्शन; शिवसेना नेत्याने थेट पुरावेच आणले समोर                                                     भर पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा कट्टर आमदार; रडत रडत म्हणाला, मागे लागलेला हा फेरा…
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now