Supriya Sule : प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही. राजकीय खेळ खेळताना कोण कोणावर आरोप करेल याचा अंदाज ही बांधता येत नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
विजय शिवतारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शिवतारे यांनी फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मटन खाऊन मंदिरात गेल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे दोन तरुणांशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओबद्दल सांगितले जात आहे की, हा एका हॉटेलमधील व्हिडिओ आहे. या दोन्ही तरुणांनी मटन थाळीची ऑर्डर दिली आहे. तर त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी देखील त्याच हॉटेलमध्ये मटण खाल्ले असे म्हटले जात आहे. काही फोटो देखील व्हायरल होत आहेत. पण हे फोटो सुप्रिया सुळे बारामतीतील महादेव मंदिराची पाहणी करतानाचे आहेत, अस सांगितल जात आहे.
विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर मटनाची थाळी खाऊन महादेव मंदिरात आणि सासवडच्या सोपान काकांच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्याचा आरोप केला आहे. या दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मटन खाऊन पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणे टाळले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पवार यांचा नियम मोडला, असे म्हणत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मात्र आता सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन मंदिरात प्रवेश केल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी केलेल्या या आरोपाला सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे सध्या त्यांच्या मतदारसंघात जास्त सक्रिय दिसत आहेत.
सुप्रिया सुळे त्यांच्या परिसरातील लोकांना भेटायला आल्या होत्या. तेव्हा ही घटना घडली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्यांनी अवघ्या दोन शब्दात उत्तर दिले, सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारे यांच्या आरोपांना उत्तर देण्यास नकार देत मला काहीच माहीत नाही, मी असे काहीही वाचलेले नाही, असे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
भर पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा कट्टर आमदार; रडत रडत म्हणाला, मागे लागलेला हा फेरा…
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका कपडे बदलतानाच्या व्हिडीओनंतर गौतमीने पहील्यांदाच केले मन मोकळे; ऐकून तुमचंही काळीज हेलावून जाईल