महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर त्याला अनेक लोकांनी सपोर्ट दर्शवला. कारण त्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण तरीही त्याच्या चाहत्यांची त्याचे तोंडभरून कौतुक केले.
चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा होता. सिकंदरनेही समोर येऊन निर्णय चुकीचा होता असं सांगितलं होतं. माझ्यावर अन्याय झालाय असे तो म्हणाला होता. मुलाखतीदरम्यान तो म्हणाला की, झालं गेलं विसरून जाऊ आणि एक दिवस माझ्या चाहत्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी आनंदाश्रू असतील असंही तो म्हणाला होता.
त्यानंतर लगेच दुसऱ्याच आठवड्यात त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सांगली येथे सध्या विसापूर केसरीच्या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत सिकंदर शेखनेही सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने मैदान मारलं आहे. मोळी डावात त्याने पंजाबच्या पैलवानाला फक्त ५ मिनीटात मैदानावर लोळवलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
एकीकडे महाराष्ट्र केसरीचा वाद सुरू असताना त्याने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. या कुस्तीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडीओला भरभरून लाईक करत आहेत. अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. सिकंदर शेख याने 5 लाख रुपयांची कुस्ती जिंकली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.
यावेळी राज्यभरातील कुस्तीप्रेमी विसापुरात उपस्थित होते. यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील प्रसिद्ध पैलवानांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून पैलवान कुस्ती लढण्यासाठी येत असतात, त्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व होते. या मैदानावर 150 ते 200 लहान-मोठ्या कुस्त्या होतात.
अंतिम फेरीत सिकंदरने आपले कौशल्य दाखवत पंजाबच्या नवजीत सिंगवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखून ठेवले होते. शेवटी सिकंदर नवजीत सिंगला पराभूत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता आणि या गेममध्ये तोच सिकंदर आहे हे त्याने दाखवून दिले.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिकंदरला कुस्तीपटू महेंद्र गायकवाडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात पंचांनी दिलेला एक निर्णय वादात सापडला होता. सिकंदरवर जाणीवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करत अंपायरच्या निर्णयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
महत्वाच्या बातम्या
वडीलांवर कोसळला दुखाचा डोंगर; पत्नी, आईनंतर आता मुलाचाही मृत्यु, वाचा नेमकं काय घडलं
भारताला एकहाती जिंकून देणारे नवे वादळ; 34 चेंडूत ठोकल्या 78 धावा, भारताचा विश्वविक्रम
रितेश देशमुखांचा राज्यातील बड्या नेत्याच्या मुलाला मेसेज; मागीतली ‘ही’ स्पेशल मदत
क्रिकेटपटू मायकेल क्लार्कला गर्लफ्रेंडने रस्त्यातच चोपले; अर्धनग्न अवस्थेत पळत सुटला क्लार्क






