निकालाच्या वादावर अखेर सिंकदर शेखने सोडले मौन; म्हणाला, भावांनो, आता काहीच..
त्यांच्या ‘या’ निर्णयाचा मला फटका बसला आहे, सिंकदर शेखने अखेर मन केलं मोकळं
पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे.
प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखचे स्वप्न आता भंगले आहे. सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या सिकंदर शेखचा पराभव झाला आहे. महेंद्र गायकवाडसोबत सिकंदर शेखची लढत झाली होती. पण त्याचा त्या लढतीत पराभव झाला आहे. पण सिकंदरवर अन्याय झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
कुस्तीत महेंद्र गायकवाडने बाहेर लावलेल्या टांगेचा डाव बरोबर नव्हता. सिकंदर हा डेंजर पोझिशनमध्ये नव्हता. पण तरीही महेंद्रला चार गुण दिले गेले. त्यामुळे अनेकजणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत मत व्यक्त केलं आहे.
यावर आता सिंकदर शेखने मौन सोडले आहे. निकालाच्या वादावर तो म्हणाला की, माझी कुस्ती महेंद्र गायकवाड याच्यासोबत होती. मला आधी चेतावणी दिली तेव्हा पॉइंट त्याच्या खात्यात गेला. दुसऱ्या खेळीत माझे त्याच्यावर ३ पॉइंट झाले तेव्हा १-३ अशी कुस्ती चालू होती.
मी निकलला घुसलो तेव्हा त्यांनी मला टांग लावली. पण त्याची टांग परफेक्ट बसली नव्हती. पुर्णपणे कमतेचा कब्जा माझ्या हातात होता. त्याला त्यासाठी चार पॉइंट द्यायचे असतील तर मी पुर्णपणे डेंजर झोनमध्ये असायला हवा होतो. पण मी नव्हतो. मी एका अंगावर होतो आणि माझा कब्जा तिच्यावर होता.
त्यावेळी त्यांनी त्याला १ पॉइंट द्यायला हवे होते आणि मला १ पॉइंट द्यायला हवा होता. त्याऐवजी त्यांनी ४-१ असे गुण दिले. हा त्यांचा चुकीचा निर्णय होता. त्यांच्या या निर्णयाचा फटका मला बसला आहे. पुढे मला २ मिनीटात कवर करता आलं नाही. त्यांनी माझ्यावर पुर्णपणे पकड नसताना त्यांना ४-१ गुण देण्यात आला.
संपुर्ण महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब माझ्यावर प्रेम करतात. माझी कुस्ती पाहायला येतात. माझा पराभव झाला तरी तुमचं माझ्यावर प्रेम असंच राहुद्या. माझ्या पराभवानंतर सोशल मिडीयावर मी पोस्ट पाहिल्या पण भावानों आता काही उपयोग नाही हे बोलून. जिथल्या तिथं सोडून द्या. छुटा हुआ तीर वापस नही आता असं झालेलं आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
हेल्मेटशिवाय चालवत होता बुलेट, पण पठ्याने असा जुगाड केला की पकडूनही पोलिस दंड करू शकले नाहीत
शेवटच्या क्षणी बदलला प्लान अन् तिथेच झाला घात! ४ जीवलग मित्रांचा विमानप्रवास ठरला अखेरचा
पक्षाने निलंबीत करताच सुधीर तांबेंनी दिली पहीली प्रतिक्रीया; काॅंग्रेसलाच खडसावत म्हणाले…
“मी शतकांमागे पळत नाही, तर…”; 4 डावात 3 शतके झळकावल्यावर विराटने खोलले धमाकेदार वापसीचे रहस्य