जेव्हा लोक रस्त्यावर दुचाकी चालवतात तेव्हा त्यांना नेहमी भीती असते की ट्रॅफिक कॉन्स्टेबल काही चुकीमुळे त्यांना पकडेल. मात्र, तुमच्याकडे परवान्यासह सर्व कागदपत्रे असतील, तर तुम्हाला घाबरायचे काही कारण नाही. असे काही लोकं आहेत की ते असा जुगाड करतात की, ट्राफिक पोलिसही हैराण होतात.
जुगाड करून काही लोकं संकटातून सहज मार्ग काढतात. जुगाड भारतात खूप लोकप्रिय आहे, ज्याद्वारे लोकं आपलं काम सोपं करतात. ज्या कामाला तासंतास लागतात ते काम लोकं जुगाड करून सहज पुर्ण करतात. आपला हाच छंद पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड करून रॉयल एनफिल्ड बुलेट बनवली, जी पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे ही बुलेट पेट्रोल किंवा वीजेवर चालत नाही. मात्र, त्याने अशी पद्धत अवलंबली, जी पाहून वाहतूक पोलिसही अवाक् झाले. सोशल मिडीयावर या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती हळू हळू बुलेट चालवत येत आहे.
तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलने त्याला थांबवले. त्याने हेल्मेटही घातले नव्हते, पण त्याने असा जुगाड केला होता की ट्रॅफिक हवालदार त्याला दंडच मारू शकला नाही. आता तुम्ही विचार करत असाल की रॉयल एनफिल्ड बुलेट त्या माणसाने बनवलीच कशी? त्या व्यक्तीने असा कसा जुगाड केला?
त्याने बुलेटचे रुपांतर सायकलमध्ये केले. ही सायकल रॉयल एनफिल्डसारखी दिसत होती. मात्र, ती चालवण्यासाठी सायकलप्रमाणे पॅन्डल मारावा लागत होता. जर तुमची गाडी दुचाकी नसेल आणि नीट सायकलही नसेल तर पोलिसही चलान कापू शकत नाही. अशा स्थितीत ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून तो निघून गेला.
अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. त्याने हा पराक्रम केलाच कसा? हा व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करत आहे. हा व्हिडिओ बायकर बॉय जहीर या नावाच्या फेसबूक युजरने शेअर केला आहे. तो आतापर्यंत 21 लाख लोकांनी पाहिला आहे, तर 9 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
महत्वाच्या बातम्या
रितेश भाऊचा नादच खुळा…! ‘वेड’ने १६ व्या दिवशी रचला इतिहास; केला ‘हा’ अनोखा विक्रम
पत्नीच्या काळजीपोटी बुरखा घालून डिलीव्हरी वॉर्डात पोहोचला पण.., वाचा नेमकं काय घडलं
“मी शतकांमागे पळत नाही, तर…”; 4 डावात 3 शतके झळकावल्यावर विराटने खोलले धमाकेदार वापसीचे रहस्य
‘या’ मुंबईकर खेळाडूने केला कहर; 81 चौकार, 18 षटकारांच्या मदतीने केल्या 508 धावा