Share

सेहवाग भेटला तर तो माझा खूप मार खाईल; पाकिस्तानी खेळाडूचं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण परस्पर तणावामुळे दोन्ही देशांमधील मालिका अनेक वर्षांपासून होत नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतच दिसले आहेत. (shoeb akhtar on virendra sehwag)

तसेच जेव्हा-जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामने झाले आहेत, तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने त्याच्या वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. तर टीम इंडियाचा वीरेंद्र सेहवागही वेगवेगळे वक्तव्य करुन चर्चेत येत असतो.

सेहवाग आणि शोएब हे दोघेही मैदानाबाहेर चांगले मित्र असले तरी यावेळी सोशल मीडियावर दोन दिग्गजांमध्ये वाद सुरु आहे. पण ही लढत खरोखरची नाहीये. दोघेही एकमेकांची मस्करी करत आहे. सेहवागने एक कमेंट केली होती, त्यावर एका कमेंटवर अख्तर म्हणाला की, जर एखाद्या दिवशी सेहवाग माझ्या हाती लागला तर तो खूप मार खाणार.

नुकताच शोएब अख्तरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सूट परिधान केलेला दिसत होता. अख्तरने लिहिले, हा एक नवीन लूक आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. यावर सेहवागने कमेंट केली होती, ऑर्डर लिहा, एक बटर चिकन, दोन नान आणि एक बिअर.

शोएब अख्तरला अलीकडेच एका यूट्यूब चॅट शोमध्ये सेहवागच्या या कमेंटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न येताच शोएब अख्तर हसायला लागला आणि त्याला काय बोलावे ते समजत नव्हते. यावर तो म्हणाला की, एखाद्या दिवशी मला सेहवाग सापडला तर मी त्याला खूप मारेन. अख्तर हे मस्करीत म्हणतो आणि हसायला लागतो.

टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये १० वर्षांपासून एकही मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघांमधील शेवटची मालिका डिसेंबर २०१२ मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला. येथे दोन्ही संघांमधील २ टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तसेच पाकिस्तानने ३ वनडे मालिका २-१ ने जिंकली.

महत्वाच्या बातम्या-
विवाहित महिला माझ्याकडे आल्या तर मी एका रात्रीचे ५ हजार घेतो; सेक्स वर्करने सांगितले धक्कादायक वास्तव
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त होऊ शकतो, तर ‘झुंड’ का नाही? निर्मात्यांचा जळजळीत प्रश्न
“द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या अनेक घटना खोट्या, काश्मिरी पंडितांना वाचवायला मुस्लिम अधिकारी आले होते

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now