Share

धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

जम्मू आणि काश्मीर :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात असलेल्या भवनात चेंगराचेंगरीची घटना आज घडली आहे. या घटनेमध्ये तब्बल १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ भाविक जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना आज पहाटे सुमारे २.४५ च्या सुमारास घडल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही कारणावरून झालेल्या वादातून भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यातून ही घटना घडली.

तर, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली होती. पहाटे पावणे तीनच्या सुमारास गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही लोकांना बाजूला करण्यात येत होतं. त्यावेळी एका व्यक्तीला धक्का दिल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. या कारणावरून भाविक एकमेकांना धक्काबुक्की करू लागले आणि त्यात चेंगराचेंगरी झाली.

वैष्णोदेवी मंदिर परिसरात आज पहाटे सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची गर्दी झाली होती. येण्या-जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. वेगळ्या रांगा नव्हत्या. त्यातून गर्दी झाली आणि धक्काबुक्कीमुळे लोक एकमेकांवर पडले. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि लोक पळू लागले. त्यामुळे त्यांच्या पायाखाली काही लोक चिरडले गेले. त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला.

कटरा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल दत्त यांनी भाविकांच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली. सध्या जखमींना जम्मूमधील नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरवर्षी वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. करोनाच्या नियमांमुळे मागील दोन वर्षात लोकांना वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाता आले नव्हते. यंदा करोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत आणि त्यात मंदिरे खुली करण्यास देखील परवानगी मिळाली. त्यामुळे वैष्णोदेवीच्या अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली.

महत्वाच्या बातम्या :-
क्रिकेटमधून निवृत्ती घेताच भज्जीने केले मन मोकळे, धोनीवर गंभीर आरोप करत म्हणाला..
पैसा महत्वाचा का जीव? सहा हजार रुपये हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीने घेतला गळफास
रोहितच्या जागी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

इतर

Join WhatsApp

Join Now