Homeताज्या बातम्यापैसा महत्वाचा का जीव? सहा हजार रुपये हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीने...

पैसा महत्वाचा का जीव? सहा हजार रुपये हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

नाशिक:- नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनी क्लासच्या फीसाठी दिलेले पैसे हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे नाशिक शहरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपण आयुष्यमध्ये जितका संघर्ष करतो, तितकं आपल्याला त्या संघर्षातून शिकायला मिळतं. काहीवेळा अनपेक्षित घटना घडतात. पण त्या घटनांमधून आपल्याला खचून जायचं नसतं. त्या घटनांमधून आपल्याला शिकायचं असतं. या संघर्षाच्या प्रवासादरम्यान आपल्याकडून काही चूक झाली तर लगेच निराश व्हायचं नाही. उलट आपल्याला नैराश्य न येऊ देता, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हायला हवं.

पण नाशिकमध्ये एका २२ वर्षीय तरुणीने परिस्थिती समोर हार मानली. नाशिकमधील या तरुणीचे नाव श्रुती सानप असं आहे. तिने क्षुल्लक कारणावरुन वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या कुटुंबाला या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. श्रुतीने अशाप्रकारे टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया तिच्या महाविद्यालयातील शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.

श्रुती ही नाशिकमधील सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. श्रुती सानप ही तरुणी मुळची बीडची आहे. ती महाविद्यालयाजवळ असलेल्या वसतिगृहात राहत होती. श्रुतीने तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. मात्र तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुती ही दोनच दिवसांपूर्वी तिच्या घरून परत आली होती. क्लासच्या फीसाठी तिने आईवडीलांकडून सहा हजार रुपये आणले होते.

मात्र तिच्याकडून हे पैसे प्रवासादरम्यान हरवले. त्यामुळे ती खूप मानसिक तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा नाशिक पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. श्रुतीच्या या निर्णयाने कुटुंबावर केवढं मोठं संकट कोसळलं असेल याची कल्पना तिने आधी का केली नसावी? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे तरुणांना आत्महत्या करण्याआधी जरा विचार करा आणि लढा, असं आवाहन सामाजिक संघटनांकडून केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
रोहितच्या जागी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
तालिबानच्या क्रुरतेचा कळस, माजी लष्करी अधिकाऱ्याचा केला छळ, व्हिडीओ पाहून धक्का बसेल
समीर वानखेडेंनी केले एनसीबीला बाय-बाय, १००० कोटींचे ड्रग्स जप्त ते सेलिब्रीटींना अटक; ‘असा’ होता कार्यकाळ