Share

काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का, केंद्राला पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास शिवसेनेचा नकार

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा घटकपक्ष आहे. अशात राष्ट्रवादीने देशात सुरु असलेला जातीयवादाविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्राला एक पत्र लिहिले आहे. पण त्या पत्रावर शिवसेनेची स्वाक्षरीच नसल्यामुळे शिवसेना चर्चेत आली आहे. (shivsena not sign that letter to send modi government)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. असे असताना आता देशामध्ये सुरु असलेल्या जातीयवादी हिंसाचारावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रावर १३ विरोधी पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहे. मात्र त्या १३ पक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे.

या पत्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वाक्षऱ्या केल्या आहे. देशात शांतता आणि एकता कायम राहावी, अशी मागणी करत या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोऱ कारवाई करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. हे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन लिहिले आहे.

देशात भयानक हिंसाचार सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर मौन बाळगलंय. तसेच गेल्या काही महिन्यांपासून द्वेष पुर्ण भाषणालाही अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रमात होणारा हिंसाचार हा चिंतेचा विषय आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. त्याला राष्ट्रवादीने विरोध केला आहे. पण याच विषयावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे हिंदूत्व संपत चालल्याचेही भाजपकडून म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांच्या हिंदूत्वच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भिती असल्यामुळे त्या पत्रावर शिवसेनेने स्वाक्षरी केली नसावी असेही म्हटले जात आहे.

पंतप्रधानांचं मौन पाहून आम्हाला धक्का बसला आहे. आपल्या वक्तव्यांनी आणि वागण्याने समाजातील काही घटकांना चिथवण्याचं काम करणाऱ्यांविरोधात पंतप्रधान काही बोलत नाही. तसेच ते काही कारवाई करत नाही, हे धक्कादायक आहे. हे म्हणजे अशाप्रकारच्या खाजगी झुंडींना एकप्रकारे समर्थन देण्यासारखे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
KGF 2 ब्लॉकबस्टर होताच संजय दत्तचे पालटले नशीब, आता ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी
‘रावणाने सीतेचे अपहरण करून कोणताही मोठा गुन्हा केला नाही’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
चारधाम यात्रेत फक्त हिंदूंना प्रवेश; मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले….

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now