“…तर त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

पश्चिम बंगाल | देशातील केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालवर सत्ता स्थापनेसाठी भाजपचे मोठे नेते बंगालमध्ये ठाण मांडून बसले आहेत. अशातच भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

प्रचारसभेत घोष यांनी म्हटले की, “प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही.”

पुढे म्हणाले, “जर त्यांना पाय दाखवायचा असेल तर, त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामूळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल.” असं घोष यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते घोष यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच नाव न घेता त्यांनी विधान केलं असलं तरी त्यांनी ममता बॅनर्जी यांनाच उद्देशून हे वादग्रस्त विधान केलं असल्याचं बोललं जात आहे.

भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर तृणमुल काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये आगामी काळात जोरदार शाब्दिक युद्ध रंगणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणूका होणार आहेत. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“केरळमधील लोक सुशिक्षित आहेत, म्हणून भाजपला मतदान करत नाहीत” भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य
कोण अमिताभ बच्चन? म्हणत राजेश खन्नाने केला होता अमिताभचा अपमान
निलेश राणेंचा घणाघात; ‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक…’
मते मिळवण्यासाठी उमेदवाराचा अनोखा फंडा, मतदारांचे धुत आहेत कपडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.