Share

सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेत तुफान हाणामारी; शिवसेनेच्या वैभव नाईकांनी हातात दांडकं घेतलं अन्..

कणकवली तालुक्यात कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मारहाण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.

त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मारहाण झाली. या घटनेनंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या कनेडीमध्ये वातावरण तापलेलेच आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर जाताना दिसत आहेत.

पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना रोखले नाहीतर आणखी वाद पेटला असता. या व्हिडीओची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी कणकवली तालुक्यातील कनेडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आणि भाजप गटात जोरदार हाणामारी झाली.

पहिल्यांदा  शिवसेना कार्यकर्त्यांना हाणामारी झाली तर नंतर भाजप कार्यकर्त्यांना हाणामारी करण्यात आली. यानंतर वातावरण तापले होते. मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यानंतर शिवसेनेचा कार्यकर्तेही जमा झाले. भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर जोरदार राडा केला.

तसेच त्यांनी एका रिक्षाची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही भाजप कार्यकर्त्यांवर आक्रमक झाले. यादरम्यान ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वैभव नाईक यांच्या हातात एक दांडा दिसत आहे.

लाकडी दांडा घेऊन ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली नसती तर वाद आणखी वाढला असता. मोठा वाद टळला अन्यथा राडा अधिक चिघळण्याची शक्यता होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले नसते तर वातावरण चिघळले असते.

https://twitter.com/MaheshDixit/status/1617969266107764741?s=20&t=22F78Y-AVOBtvFn1Gc_6_A

महत्वाच्या बातम्या
अजितदादा-फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीमागे होता शरद पवारांचा हात; जयंत पाटलांच्या कबुलीने खळबळ
नागपूर पोलिसांकडून बागेश्वर बाबांना क्लीनचीट; म्हणाले, अंधश्रद्धेसारखं काहीच नाही…
‘हरलो असो तरी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच’; वाद शांत होताच सिकंदरने पुन्हा ठोकला शड्डू
आईच्या दुधाला अन् बापाच्या रक्ताला बेईमान झालेल्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now