शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेल्या आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिक संतापले आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
कोल्हापूरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि बंडखोर आमदारांबद्दल आपला राग व्यक्त केला. त्यानंतर आता मुंबईमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. मुंबईतील सदा सरवणकर यांच्या पोस्टरला आधी काळे फासण्यात आले आणि नंतर ते पोस्टर फाडण्यात आले.
सदा सरवणकर यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे पोस्टर फाडण्यात आले आणि त्याच्या जागी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. दादर माहीमचे आमदार असलेले सदा सरवणकर नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदार गटात गेले आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
सदा सरवणकर यांचे पोस्टर ज्या ज्या ठिकाणी होते त्यांना काळे फासून ते पोस्टर उतरवण्यात आले आहेत. यावेळी सदा सरवणकर गद्दार है अशा घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे राज्यातले वातावरण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. फक्त सदा सरवणकरच नाही तर बाकीच्या बंडखोर आमदारांच्या विरोधातही शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बंडखोर आमदारांचे पोस्टर आहेत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. आमदार दीपक लांडे यांच्याही पोस्टरला काळे फासून ते पोस्टर फाडण्यात आले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संताप आता वाढत आहे.
जर हे असंच चालू राहिलं तर पुर्ण महाराष्ट्रात वातावरण बिघडू शकते. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच त्यांची आमदारकी रद्द करण्याची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
‘..त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही’; असं काय झालं की अजितदादांनी काढली स्वत:चीच लायकी
VIDEO: बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, कुर्ल्यातील ऑफिस फोडले
उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते… पण इतक्यात त्यांना ‘या’ नेत्यांचे फोन आले; वाचा फेसबुक लाईव्हपूर्वी काय घडलं
“शिंदे गटाने अजून पाठिंबा काढलेला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत”