महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या बऱ्याच दिवसांपासून खळबळ माजली होती. पण गुरूवारी या सगळ्या घटनांना पुर्णविराम मिळाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद पदाचा स्विकार केला.
महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रयत्न केले पण ते कोसळणारे सरकार वाचवू शकले नाहीत. यावरून आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, काँग्रेसही अतिशय अजब आहे.
जो व्यक्ती स्वताचं सरकार वाचवू शकला नाही त्याला महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. इथं मुख्यमंत्री शिवराज चौहान कमलनाथ यांच्याबद्दल बोलत होते. पुढे ते म्हणाले की, हम तो डूबे है सनम तुम को भी ले डुबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले.
मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसचे तर एकच नाथ आहेत, बाकी पुर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही शिवराज सिंह चौहान यांनी लगावला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज कामाला सुरूवातही केली.
एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये अतिशय साध्या पद्धतीने हा शपविधी गुरूवारी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आधी त्यांनी ठरवलं होतं की ते मंत्रिमंडळातून बाहेर राहतील. पण नंतर केंद्राकडून आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रात्री उशीरा एकनाथ शिंदे उशिरा गोव्यात ताज हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी शिवसेना आणि अपक्ष बंडखोर आमदारांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं होतं. शिवसेनेच्या महिला आमदारांनीही त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना पेढा भरवला.
#WATCH | It's strange of Congress to send a person (Kamal Nath) to save Maharashtra govt who couldn't save his govt…Poor Uddhav…Congress has only one 'Nath', rest of Congress is 'Anath' (orphan): Madhya Pradesh CM & BJP leader Shivraj Singh Chouhan said last night in Jabalpur pic.twitter.com/yIR1bDHdUE
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 30, 2022
महत्वाच्या बातम्या
“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा बोल्ड आहे मिका सिंगची होणारी बायको, फोटो पाहून थक्क व्हाल
”फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच केंद्राने त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं”
छातीतील गॅस आणि हार्ट अटॅकमधला फरक कसा ओळखावा? अनेक जण होतात कन्फ्युज, वाचा सोप्या भाषेत