दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे सरकारमधील बरेच नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
या बैठकीनंतर आमदारांची नाराजी दुर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश होता. त्यामुळे असाही अंदाज वर्तवला जात आहे की, पंकजा मुंडे यांची नाराजी दूर होऊ शकते. त्यांना लवकरच मंत्रीपद दिले जाऊ शकते. सध्या महाराष्ट्रात २० मंत्री आहेत.
आणखी २० मंत्रिपदं रिक्त आहेत. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदे बाकी आहेत. आता पुर्ण विस्तार करायचा की काही पद नंतर भरायची यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तसंच भाजपमधून आणि शिंदे गटातून कोणाकोणाला संधी द्यायची यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी स्वता याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. शिंदे गटातून अनेक नेते स्पर्धेत आहेत. त्यामध्ये बच्चू कडू, सुहास कांदे, चिमणराव पाटील, संजय गायकवाड, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे.
भाजपमध्येही मंत्रिमंडळाच्या पदांसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामध्ये सीमा हिरे, देवयानी फरांदे, नितेश राणे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि संजय कुटे यांचा समावेश आहे. तरूण खासदारांनाही संधी देण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात हा शेवटचा विस्तार असेल. पुढच्या वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे मोदींकडे एक वर्ष आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी असा दावा केला आहे की, शिंदे गटातल्या खासदारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रातून नारायण राणेंचं मंत्रिपद धोक्यात आहे. राणेंकडे लघु, सुक्ष्म मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांना या पदावर येऊन दीडच वर्ष झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मैं अब्बा का सपना पूरा कर रहा हूं’, नंबर १ बनताच सिराज भावूक, वडीलांच्या आठवणीत अश्रू अनावर
अदानींचे दिवस भरले! एका दिवसातच बसला ४६ हजार कोटींचा फटका, वाचा नेमकं काय घडलं
बागेश्वर बाबा माईंड रिडींगचा दावा करतात ती माईंड रिडींग कशी करतात? जाणून घ्या यामागचं विज्ञान
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन