राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. तर सत्ताधारी नेते केंद्रीय तपास यंत्रणांवरुन भाजपवर निशाणा साधत आहे. तसेच भाजप नेत्यांवर महाराष्ट्र पोलिस कारवाया करत आहे, त्यावरुनही भाजप राज्य सरकारवर आक्रमक होत आहे. (sharad pawar on bjp leaders)
अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही. पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला शरद पवारांनी यावेळी दिला आहे. मुंबईत विधीमंडळाच्या अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी शरद पवारांनी हे म्हटले आहे.
सध्या मुंबईत विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वाद पाहायला मिळत आहे. या वादळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार उपस्थित झाले आहे. त्यात महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बोनके यांच्यासह अनेक आमदार उपस्थित आहे. या आमदारांनी शरद पवारांशी चर्चा केली होती.
शरद पवारांचा त्यांच्या वाढत्या वयात असलेला आत्मविश्वास पाहून महाविकास आघाडीचे युवा आमदार हैराण झाले होते. शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर जवळपास दोन तास ही बैठक झाली. या बैठकीत पवारांनी आमदारांची मते जाणून घेतली. तसेच यशस्वी वाटचालीसाठी कानमंत्रही दिला.
बैठक संपवून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हातवर करत मुठ बांधली. घाबरायचे कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. भाजपला या राज्यात येऊ देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला शरद पवारांनी आमदारांना दिला आहे.
मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही. भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या आहे. जसे की दिवस-रात्र मेहनत घेण्याची तयारी, कामाचे मार्केटींग, नियोजनबद्ध व्युहरचना आखून निवडणूक लढवण्याची तयारी हे त्यांच्यकडून शिकण्यासारखे आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
१०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही; निर्दोष सुटका होणार
भगवंत मान यांच्या ऑफीसमध्ये फक्त भगतसिंग आणि आंबेडकरांचा फोटो; राष्ट्रपती, पीएमचा फोटो का नाही? काय आहे नियम?
विमानतळावर IPS अधिकाऱ्याच्या बॅगेतून निघाल्या वाटाण्याच्या शेंगा; लोकं म्हणाले, ‘वाटाणा स्मगलिंग सुरू आहे’