Share

देशाची सत्ता असणाऱ्या अमित शहांना दिल्ली सांभाळता येत नाही हे ‘या’ वरून सिद्ध होते; शरद पवारांची जहरी टिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या परीवार संवाद यात्रेचा समारोप शनिवारी झाला. यावेळी तपोवन मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यत्र शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली होती. सभेत बोलताना शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. (sharad pawar criticize amit shaha)

ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सांप्रदायिक आणि धार्मिक तेढ वाढवत मतांचा जोगवा मागत आहेत, अशा काळात देश एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे संकूचित विचारांना खड्ड्यासारखं बाजूला सारा, असे शरद पवारांनी सभेत बोलताना म्हटले आहे.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा शरद पवारांनी भाजपला दिला आहे. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे.

मी भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकर यांचीच नावे घेतो , असा सवाल काही लोक करतात. त्यांना महाराष्ट्र कळलाच नाहीये, असा टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच शिवाजी महाराज हे आमच्या अंत:करणात आहेत. शाहू, फुले आणि आंबेडकरांनी समतेचा विचार घराघरात पोहचवला त्यामुळे त्यांची नावे आम्ही घेतो, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

हा देश एकसंघ ठेवण्याचे फार मोठे आव्हान सध्या आपल्यासमोर आहे. सात वर्षांपूर्वी देशात वेगळी परिस्थिती होती. भाजपच्या हातात सत्ता आल्यापासून माणसाचं दु:ख कमी करण्यापेक्षा माणसामाणसांत अतंर निर्माण केलं जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवारांनी भाजपवर केला आहे.

तसेच दिल्लीत नुसतीच जाळपोक होत आहे. तेथे केजरीवाल यांचे सरकार असले तरी जबाबदारी केंद्रातील गृहखात्याची आहे. देशात सत्ता असणाऱ्या अमित शहांना दिल्ली सांभाळता येत नाही, हे दंगलीवरुन सिद्ध होते, अशी टीकाही शरद पवारांनी अमित शहांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांच्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी, गाडी फोडली
१७ वर्षीय मुलीला गरोदर केल्याप्रकरणी १२ वर्षीय मुलावर गुन्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सत्तेचा इतका माज? इतकी दंडुकेशाही?, राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now