Share

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण, ट्विट करत म्हणाले..

राजकारणात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचं आणि कोरानाची चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (sharad-pawar-corona-positive)

आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि विविध पक्षातील नेते कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

यातील काही नेत्यांनी योग्य उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ४० हजार ८०५ नवीन रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब अशी आहे की २७ हजार ३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या लोकांचा आकडा ७० लाख ६७ हजार ९५५ वर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९४.१५ टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाचे २ लाख ९३ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे रविवारी ४४ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

सध्या राज्यात कोरोनाचा मृत्युदर १.८१ टक्के एवढा आहे जो कमी आहे. राज्यात रविवारी एकाही ओमायक्रॉन बाधिताची नोंद झालेली नाही. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे २ हजार ४५९ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान, चाहत्यांनी केली कारवाई करण्याची मागणी
चिंतेत आणखी भर! एका व्यक्तीला कितीवेळा होऊ शकते ओमायक्रॉनची लागण?; उत्तर ऐकून बसेल तुम्हाला धक्का
मुंबईचा दिलदार ऑटोवाला! लता मंगेशकरांच्या उपचारासाठी दान केली संपुर्ण कमाई
पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..

राजकारण

Join WhatsApp

Join Now