Share

Sharad pawar : ‘या’ निवडणूकीत पवारांनी अचानक भाजपच्या शेलारांसोबत केली युती, समीकरण बदलणार 

Sharad pawar | सध्या सगळ्या मुंबईचे लक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीककडे लागले आहे. या निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामुळे या निवडणूकीला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे.

कारण निवडणूकीत भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युती केली आहे. जरी भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये शत्रुत्व असलं तरी या निवडणूकीवर त्याचा जास्त काही परिणाम होत नाही. पण सध्याचं राजकारण जर पाहिलं तर कोणाचं कोणाशी जुळू शकतं काहीही सांगता येत नाही.

हा एक उत्सुकतेचा विषय ठरला आहे. एमसीए निवडणुकीतलं हे चित्र सगळ्यांनाच धक्का देणारं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यातच शरद पवारांनी आशिष शेलारांसोबत युती केल्याचं एक पत्र जारी झालं आहे. त्यामुळे या निवडणूकीला कलाटणी मिळाली आहे असं म्हणता येईल. या निवेदनावर दोघांचीही सही आहे. हा गट जाहीर करण्याआधी शरद पवार आणि आशिष शेलार यांची भेट झाली. दोघांनीही दक्षिण मुंबईत बराच वेळ या विषयावर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

या भेटीनंतर दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला असं बोललं जात आहे. येत्या २० ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. या निवडणूकीत शरद पवार यांच्या गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.

आशिष शेलारांसोबत शरद पवारांनी युती केल्याने संदीप पाटील आणि बाकीच्या उमेदवारांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संयुक्त गटात फडणवीसांच्या जवळचे मानले जाणारे अमोल काळे तर पवारांचे निकटवर्तील मानले जाणारे जिंतेद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. तसेच या गटात शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरही आहेत. शरद पवारांच्या गटातील अजिंक्य नाईक हे पवार-शेलार गटात सेक्रेटरी या पदावर काम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Atul Bhatkhalkar : मृत्यूदिनीही महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे मुलायमसिंगांवर टिकास्र; श्रद्धांजली देताना म्हणाले कारसेवकांवर गोळ्या झाडणारे…..
politics : ‘आता शिवसैनिक आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याला शिंदे गट आणि भाजप जबाबदार’
Uddhav Thackeray : ठाकरेंविषयी सहानभूती वाटते, धनुष्यबाण गोठवल्यामुळे आम्हालाही दुख: झालय, पण..; बड्या भाजप नेत्याचे वक्तव्य
Rekha : रेखा व जया तुफान भांडत होत्या पण अमिताभची मध्ये पडण्याची डेरींग नाही झाली; कारण विषयच हार्ड होता

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now