Share

शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ आज, बुधवार, 25 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सकाळपासून पठाण थिएटरमध्ये राडा करत आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने आधीच रेकॉर्ड तोडले आहेत आणि चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर शाहरुखची जादू पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहांबाहेर रांगा लावत आहेत.

https://twitter.com/taran_adarsh/status/1617933088469970946?s=20&t=O6StQd1nMCzB61S6sAN67Q

‘पठाण’ चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीच्या पार्श्वभूमीवर, निर्माते यशराज फिल्म्सने आज रात्री 12.30 वाजल्यापासून संपूर्ण भारतात उशिरा रात्रीचे शो सुरू केले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे, जेव्हा रात्री 12.30 वाजता चित्रपटगृहांमध्ये शो सुरू होणार आहेत.

https://twitter.com/V1M30/status/1618075019854368769?s=20&t=saMVfRbAtOzVi24ZPqwdTQ

किंग खानचा पठाण चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह पाहता YRF च्या निर्मात्यांनी रात्री उशिरा शो सुरू केले आहेत. 26 जानेवारीच्या निमित्ताने मेकर्सनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. आत्तापर्यंत हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

https://twitter.com/rohitjswl01/status/1618081828598075400?s=20&t=MdjPx_5jP_U_Y9KLhWLOGQ

चाहत्यांच्या प्रचंड मागणीमुळे रिलीजच्या दिवशी अतिरिक्त 300 शो देखील जोडले गेले आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पठाणने आज, 52.50 कोटी रुपयांचे बंपर कलेक्शन केले आहे. शाहरुखने प्रभासच्या बाहुबली चित्रपटाला पहिल्याच दिवशी पराभूत केले आहे.

या शानदार कलेक्शनसह शाहरुखने आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाला मागे टाकले आहे. आमिरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 52.25 कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.

https://twitter.com/amitbhatia1509/status/1618056380551942144?s=20&t=nqK5Hz633k6Txx7XB2L2nA

बॉलीवूडसोबतच साऊथ आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील स्टार्सही ‘पठाण’ चित्रपटावर आपलं मत मांडत आहेत. पठाण चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोकांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया येत आहेत. पैसा वसुल चित्रपट असल्याचे काहींचे म्हणणे आहे. अनेक नेटकऱ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर बॉयकॉट गँगला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

https://twitter.com/rohitjswl01/status/1618106093774999552?s=20&t=Sda4zeg92eLjbSQCJ1-tuA

चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून बॉयकॉट गँग कोमात गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. सोशल मिडीयावर बॉयकॉट गँगच्या विरोधात भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत. शाहरूखचे काही चाहते तर तिकीट मिळवण्यासाठी थिएटरच्या बाहेर झोपले आहेत. याचा एक फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/Harmindarboxoff/status/1618072372162199560?s=20&t=gbChiqIG1TW6bBXDlD1oyg

महत्वाच्या बातम्या
मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गट अन् भाजपमधील ‘या’ नेत्यांची लागणार वर्णी, दिल्लीत झालं शिक्कामोर्तब? 
मराठमोळ्या केदार जाधवची रणजी ट्रॉफीमध्ये दहशत, गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्या 553 धावा
सामन्याच्या एक दिवस आधी अष्टपैलू रवींद्र जडेजाची अचानक संघात एन्ट्री, कर्णधारपदही मिळाले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
ठाण्यातील २२ नगरसेवक राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत, ६ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश  

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now