Share

पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित होताच शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत ते शक्य नाही.” असे शाहबाज शरीफ यांनी बोलून दाखविले आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्यांना 174 मते मिळाली आहेत. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. परंतु यापूर्वीच त्यांनी भारताविषयीही सूचक वक्तव्य केले आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना ‘राजनैतिक व नैतिक पाठिंबा’ देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल. याचबरोबर “दहशतवादमुक्त प्रांत ठेवण्यासाठी दोन्ही देश काम करतील” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

यानंतर शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांची दखल घेतली आहे. शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर मोदींनी शरीफ यांना शुभेच्छा देत एक ट्विट शेअर केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन.

भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या याच ट्विटची दखल शरीफ यांनी घेतली आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या राजकारनात या काळात मोठी उलथापालथ बघायला मिळाली आहे. आता इम्रान खान यांना हटवल्यानंतर पंतप्रधान पदासाठी शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. तर दुसरीकडे इम्रान यांच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकर या रिक्त पदांसाठीच्या निवडणूका पार पडणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
‘या’ सरकारी अधिकाऱ्यामुळे पुर्ण जगात खराब झाली बिहारची प्रतिमा, ६० फुटांचा पुलच केला चोरी
आलिया-रणबीरच्या लगीनघाईत समोर आली ऋषी-नीतू कपूरची ४२ वर्षांपुर्वीची पत्रिका, पहा फोटो
ऑरेंज कॅप अवॉर्ड हा IPL च्या इतिहासातील सगळ्यात मोठा मुर्खपणा कारण.., दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
मित्रांच्या नादात महिलेचा झाला मोठा गेम, टॉपलेस होऊनच मैदानात आली पळत, पुढे घडला ‘हा’ प्रकार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now