Share

शुभ मुहूर्त नाहीये म्हणत तब्ब्ल ११ वर्षे पत्नी राहिली पतीपासून दूर; शेवटी कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

भारतात घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू घरात आणणे, लग्न करणे या सर्व गोष्टी शुभमुहूर्त पाहून केल्या जातात. शुभमुहूर्त पाहून सर्व गोष्टी केल्यास चांगले मानले जाते. मात्र, जर कोणी पत्नी शुभमुहूर्ताचे कारण देत लग्न झाल्यानंतर सासरी जायला तयार नसेल तर तुम्ही काय म्हणाल? अशीच एक घटना घडली असून, पत्नीने शुभमुहूर्ताचे कारण देत ११ वर्षांपासून सासरी जायला नकार दिला आहे.

छत्तीसगड उच्च न्यायालयाने या अनोख्या प्रकरणात घटस्फोटाचा आदेश जारी केला आहे. लग्नानंतर ११ वर्षांपासून पत्नी शुभमुहूर्त नसल्याने सासरच्या घरी येण्यास नकार देत आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि रजनी दुबे यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की शुभ काळ हा कुटुंबाच्या आनंदी काळासाठी असतो. मात्र इथे पत्नीने तिचे वैवाहिक जीवन सुरू करण्यासाठी याचा एक अडथळा म्हणून वापर केला आहे.

हिंदू विवाह कायद्यांतर्गत न्यायालयाने हे लग्न मोडीत काढले आहे. घटस्फोटाच्या आदेशाला हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (IB) अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, वस्तुस्थितीनुसार पत्नीने पतीला पूर्णपणे सोडले आहे, त्यामुळे तो घटस्फोट घेण्यास पात्र आहे. या आदेशाची प्रत आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खरेतर, अपीलकर्ता संतोष सिंग यांनी यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, त्यावेळी, परित्यागाच्या कारणावरून त्याची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार, संतोष सिंहचा जुलै२०१० मध्ये विवाह झाला होता. तो ११ दिवस पत्नीसोबत राहिला, त्यानंतर पत्नीचे कुटुंबीय आले आणि त्यांना काही महत्त्वाचे काम असल्याचे सांगून तिला घेऊन गेले.

यानंतर पतीने तिला तिच्या माहेरून सासरच्या घरी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र योग्य शुभ मुहूर्त नसल्याचे सांगत पत्नीने जाण्यास नकार दिला.याचबरोबर याचिकेला उत्तर देताना पत्नीने असा युक्तिवाद केला आहे की, ती पतीच्या घरी यायला तयार होती पण शुभ मुहूर्त सुरू झाल्यावर तो तिला परत घेण्यासाठी पुन्हा आला नाही, जे त्यांच्या प्रथेनुसार आवश्यक होते. पत्नीने असेही सांगितले की तिने आपल्या पतीला सोडले नाही आणि प्रथेनुसार मला परत नेण्यात त्याला अपयश आले.

तथापि, संतोष सिंगच्या वकिलाने असे सादर केले की पत्नीला माहित आहे की वैवाहिक हक्क पुनर्संचयित करण्याचा हुकूम मंजूर झाला आहे, परंतु तरीही ती आपल्या पतीसोबत वैवाहिक जीवनात गुंतली नाही. न्यायालयात हजर झालेल्या पत्नीच्या वकिलांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमधील प्रचलित प्रथा अशी होती की दुहेरी प्रवेश समारंभात पतीने येणे आवश्यक होते.
महत्वाच्या बातम्या

विकृत सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, सुनेने केला व्हिडिओ व्हायरल
गांधींना शिव्या देणाऱ्या कालिचरनला महाराष्ट्र शिकवणार धडा; महाराष्ट्र पोलीसांनी घेतला ताबा 
कोरोना झालेली नर्स ४५ दिवसांपासून गेली होती कोमात, व्हायग्राचा एक हेवी डोस देताच आली शुद्धीवर

इतर

Join WhatsApp

Join Now