Homeक्राईमविकृत सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, सुनेने केला व्हिडिओ व्हायरल

विकृत सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, सुनेने केला व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. या घृणास्पद घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक वृद्ध व्यक्ती एका कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या घृणास्पद घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नराधम वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील वसुंधरा भागात एक ६० वर्षाच्या व्यक्ती कुत्र्यावर बलात्कार करत होता. तेव्हा त्याच्या सुनेने या घटनेचा व्हिडीओ तिच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये शूट केला. आपली सून त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ शूट करत असल्याचे त्या वृद्ध व्यक्तीच्या लक्षात आले. त्याने तात्काळ त्याच्या सुनेकडे धाव घेतली आणि तो तिचा पाठलाग करू लागला.

सुनेकडून त्या वृद्ध व्यक्तीने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण सुनेने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या सुनेला मारहाण केली. या झटापटीमध्ये सुनेने प्रयत्न करून आरोपी सासऱ्यापासून स्वतःचा मोबाईल वाचवला. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सासरा आणि त्याच्या सुनेमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे.

सुनेने या घटनेबद्दल प्राणी-मित्र या सामाजिक संस्थेला सविस्तर माहिती दिली. या सामाजिक संस्थेने तात्काळ सक्रिय होऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर या घटनेबाबत वेगाने कारवाई सुरु झाली. ही बाबा उघडकीस येताच पोलिसांनी या नराधम व्यक्तीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने यापूर्वीदेखील असे कृत्य केले होते.

या घटनेत पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त सिटी ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, “त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत कारवाई केली आहे. प्राणी अत्याचार केल्याप्रकरणी त्या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.”

या घृणास्पद कृत्याविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. त्या वृद्ध व्यक्तीला या कृत्याबाबत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्राणी-मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या प्राण्यांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
तरुणीने विमा एजंटला व्हिडिओ कॉल करून काढले सगळे कपडे; मग सुरु झाला भयंकर खेळ ..
आणखी एका महाराजाचे गांधीजीं विरोधात वक्तव्य; म्हणाले गांधी तर देशद्रोही, त्यांच्यामुळे फाळणी झाली..
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही, मात्र…; वाचा काय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय