Homeताज्या बातम्या'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समंथाला मिळाले दीड कोटी; अल्लू अर्जुनची फी ऐकून व्हाल...

‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समंथाला मिळाले दीड कोटी; अल्लू अर्जुनची फी ऐकून व्हाल थक्क

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा १७ डिसेंबरला भारतात आणि जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तामिळ या पाच भाषांमध्ये दाखवण्यात आला आहे. भरपूर ड्रामा आणि ऍक्शन असलेल्या या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतातील लोकांना भलतेच वेड लावले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनाचा धोका वाढलेला असतानाही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

आता सोशल मीडियावर या चित्रपटातील कलाकारांना आणि दिग्दर्शकाला किती मानधन मिळाले याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांना किती पैसे मिळाले, यासंदर्भात त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांना किती मानधन मिळाले आहे, हे जाणून घेऊयात.

‘पुष्पा: द राइज’ चित्रपटात मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने पुष्पाराज नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी भरघोस मानधन मिळाले आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी ५० कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री रश्मिकाला या चित्रपटासाठी ८ ते १० कोटींचे मानधन देण्यात आले आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात ‘ओ अंतवा ऊओ ऊ’ हे आयटम साँग केले आहे. बातमीनुसार, फक्त या आयटम साँगसाठी अभिनेत्री समंथाला १.५ कोटी ते २ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. पुष्पा: द राइज’ या चित्रपटात तेलुगू अभिनेता सुनीलने मंगलम श्रीनूची भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुनीलला या भूमिकेसाठी १ ते १.५ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे.

अभिनेता फहाद फासिलने या चित्रपटात आयपीएस अधिकारी ‘भंवर सिंग शेखावत’ याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याची खलनायकाची भूमिका आहे. अभिनेता फहाद फासिल हा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. बातमीनुसार, अभिनेता फहादला या चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मिळाले आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अनसुया भारद्वाज हिने या चित्रपटात एका अतिशय सशक्त महिलेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री अनुसया भारद्वाज हीने दीड ते दोन लाख रुपये प्रतिदिवस मानधन आकारले आहे. तेलुगु दिग्दर्शक सुकुमार यांनी आर्या, रंगस्थलम यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटासाठी त्यांना २५ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. देवी श्री प्रसाद हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत. बातमीनुसार, त्यांना सुमारे साडेतीन कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शुभ मुहूर्त नाहीये म्हणत तब्ब्ल ११ वर्षे पत्नी राहिली पतीपासून दूर; शेवटी कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलोय, ज्याला दाखवायचं त्याला वेळेला दाखवतो”
विकृत सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, सुनेने केला व्हिडिओ व्हायरल