Share

‘ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!’

सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचं सहा जागांसाठी मतदान झालेलं आहे पण अजूनही मतमोजणीला सुरूवात झालेली नाही. त्यानंतर आता शिवसेनेकडून भाजपवर गंभीर आरोप होत आहेत. संजय राऊतांनी एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू. त्याआधी त्यांनी काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलेले ट्विट शेअर करत महाराष्ट्रातही असं घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं म्हटलं होतं. भाजपने मतपत्रिका इतरांना दाखवल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे, यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे.

आरोप केल्यानंतर त्यांनी निवडणुक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. पण त्यानंतर निवडणुक आयोगाने ही तक्रार फेटाळून लावत भाजपला झटका दिला. त्यानंतर भाजपने थेट केंद्रिय निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे. यानंतर आयोगाने यावर ऍक्शन घेत मतदानाचा व्हिडीओ मागवून तो तपासून नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे मतमोजणीला सुमारे दीड तास उशीर झाला आहे. हे सगळं झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे आणि भाजपवर टीका केली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1535249738374623232?s=20&t=zhgLXLTyDD-Irig5XW4UrA

दरम्यान, भाजपचे पोलिंग असलेल्या पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली होती. याबद्दल बोलताना पराग अळवणी म्हणाले, ‘मी स्वतः पियुष गोयल यांचा पोलिंग एजंट या नात्याने यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानाबद्द्ल आक्षेप घेतला आहे.’

‘मतदान करतांना प्रत्येक पक्षाच्या मतदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. याबाबात आक्षेप आम्ही नोंदवला असल्याच पराग अळवणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

https://twitter.com/rautsanjay61/status/1535258475172876288?s=20&t=zhgLXLTyDD-Irig5XW4UrA

महत्वाच्या बातम्या
एकाचवेळी १८ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, शेणाने आणि गौमुत्राने अंघोळ करत केले ‘वेलकम बॅक’
रोहित किंवा राहुलच्या जागी संघात जागा पाहिजे का? इशान किशनचे उत्तर ऐकून सगळेच झाले थक्क
आवेश खानच्या खतरनाक यॉर्करने रासीच्या बॅटीचे मधूनच झाले दोन तुकडे, पहा व्हिडीओ
याला महीन्यात पठ्ठ्या! शेतकऱ्याने अवघ्या ४ महीन्यात कमावले १८ लाख; जाणून घ्या टेक्नीक..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now