सध्या राज्यातील वातावरण वेगवेगळ्या मुद्यावरुन तापलेले आहे. अशात मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरीत नागरिकांसाठी लवकरच मुंबईत एक ऑफिस उघडणार आहे. मुंबईत उघडणारे हे कार्यालय उत्तर प्रदेश सरकारचं असणार आहे. (sanjay raut on up government office)
उत्तर प्रदेश सरकारच्या या कार्यालयातूच्या माध्यमातून त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे. तसेच मूळ राज्यातील गुंतवणूक, रोजगार, पर्यटन यांसाठी त्यांच्याशी समन्वय साधला जाणार आहे. सध्या हा मुद्दा राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय उघडणार यावर राजकीय नेते आता प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा लवकरच अयोध्येत, वाराणसीमध्ये कार्यालय उघडणार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची भवनं उभी केली गेली आहे. देश हा एक आहे, तर आपण कोणत्याही राज्यात जाऊ येऊ शकतो. आम्ही अयोध्येत जाऊन एक सेंटर उभा करणार आहोत. मुख्मंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे. हा सरकारी विषय आहे खाजगी विषय नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अनेकदा जेष्ठ नेत्यांचा सल्ला घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं मार्गदर्शन ते घेत असतात. त्यांनी स्वत: याबाबत अनेकदा सांगितलं आहे, असे म्हणत संजय राऊतांनी यावेळी भाजपलाही टोला लगावला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवरही आरोप केले आहे. किरीट सोमय्या हे स्वत: ला भ्रष्टाचाऱ्याच्या विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. आज मी त्यांचा खरा चेहरा काय आहे याचे प्रकरण समोर काढले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
मोतीलाल ओसवाल या शेअर बाजार कंपनीत ५ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाला होता. या कंपनीची चौकशी करा, अशी मागणी केली होती. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून लाखोंच्या देणग्या मिळाल्या आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच या घोटाळ्यात सोमय्यांचा संबंध आहे. तुम्ही कुठल्या भ्रष्टाचाराचा लढा लढत आहात. तुमचं काय उत्तर आहे. त्यात तुमचा खुलासा नाही. युवक प्रतिष्ठान ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग आहे. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी धर्मादाय आयुक्त, आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे. ईडीकडेही याची तक्रार करणार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना उंदीर म्हटल्याने भडकले शिवसैनिक; म्हणाले, एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून…
महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार- संजय राऊत
मुंबईच्या संघात स्थान नाही म्हणून अर्जून तेंडूलकरला करावं लागतंय ‘हे’ काम, चाहते पण हैराण