Share

न्यायदेवतांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असून त्या पट्टीला एक छिद्र आहे अन्..; संजय राऊतांचे रोकठोक विधान

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. तसेच सत्ताधारीही भाजप नेत्यांवर वेगवेगळे आरोप करताना दिसून येत आहे. तसेच राज्य सरकारकडून काही नेत्यांवर कारवाई केली जात आहे. पण अशात भाजपच्या एका आमदाराने हैराण करणारे वक्तव्य केले आहे. (sanjay raut on court injustice)

आमच्याविरोधात शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा कितीही वापरल्या, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे, असे भाजप नेते संजय कुटे यांनी म्हटले आहे. संजय कुटेंच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात उलट सुलट चर्चा होत आहे. आता संजय कुटे यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

न्यायालयाने किरीट सोमय्यांबाबत दिलेला निर्णय हा १०० टक्के दिलासा घोटाळा आहे. विशिष्ट राजकीय पक्षाच्या किंवा विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना दिलासा देण्यासाठी न्यायव्यवस्था काम करतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांचा उजवा हात समजले जाणाऱ्या आमदार संजय कुटे यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या गोष्टी आम्ही पोलिस प्रशासनाकडून करु शकत नाही, त्या गोष्टी आम्ही न्यायालयाकडून करुन घेतो. न्यायालयात आमचे वजन आहे. भाजप नेत्यांना मिळत असलेला दिलासा पाहता ते वजन कसले, हे आम्ही पाहत आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

दिशा सालियन, मुंबै बँक ते आयएनएस विक्रांत घोटाळा अशा सर्व प्रकरणांमध्ये भाजप नेत्यांना रांगेने दिलासा मिळत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे किंवा न्यायव्यवस्थेत आपल्या विचारसरणीची लोकं बसवण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच न्यायदेवतांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. पण त्या पट्टीला एक छिद्र पडलं आहे. या छिद्रातून न्यायव्यवस्था आपल्या विचारसरणीच्या लोकांकडे पाहत आहे. सोमय्यांवर सत्र न्यायालयाने बेईमानीचा ठपका ठेऊनही उच्च न्यायालयाने पुरावे कुठे आहे, अशी विचारणा केली आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आशा भोसलेंचा मुलगा अचानक झाला बेशुद्ध, दुबईच्या हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
..तर परदेशातून कोळसा विकत घ्यावा लागला नसता, उर्जामंत्री नितीन राऊत यांचा केंद्रावर गंभीर आरोप
उतावळा नवरा! लग्न झाल्यानंतर आलियाला उचलून थेट मिडीयासमोर आला रणबीर, पहा भन्नाट फोटो

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now