Share

एकनाथ शिंदेंसोबत संपर्क झालाय..; हाय होल्टेज ड्राम्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रीया

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीसह शिवसेना मोठा धक्का बसणार असल्याच बोललं जातं आहे. आता सगळ्या चाललेल्या प्रकारावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, सरकार पाडण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेशी संपर्क झाला आहे असा दावाही संजय राऊतांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंसह सेनेचे काही आमदार नॉट रिचेबल आहेत पण भाजपला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न वापरून सरकार पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.

पुढे राऊतांनी असा दावा केला की, गुजरात भाजपकडून शिवसेना आमदारांची सुरतमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे पण भाजपचं षडयंत्र यशस्वी होणार नाही. काही आमदारांना परत यायचं आहे पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत म्हणाले की, ते शिवसेनेत दरी निर्माण करू शकणार नाहीत.

राऊत असंही म्हणाले की, मला वाटत नाही एकनाथ शिंदे नाराज असतील. एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. सेनेचे काही आमदार मुंबईत नाहीयेत आणि काही ठिकाणी संशयास्पद वातावरण आहे. काहीही झालं तरी भाजपला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. आमचा एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला आहे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत.

बाळासाहेबांवर एकनाथ शिंदेंची पुर्वीपासून निष्ठा आहे. वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी संपर्क झाल्याचा दावा केला पण काय बोलणं झालं हे सांगितलं नाही.  दरम्यान, आता बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? यावर सर्वांचे लक्ष आहे. शरद पवारांनी तातडीने ही बैठक बोलावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. छगन भुजबळही वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंची नाराजी भोवली! शिवसेनेच्या ११ मतांना सुरूंग! जाणून घ्या नेमकं काय घडलं
विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांचा करिश्मा! महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली
विधान परिषद! भाजपच्या ‘प्लॅन’वर फिरले पाणी! पहिला निकाल आला; एकनाथ खडसे विजयी
बहुजन विकास आघाडीची मतं कोणाला मिळाली? हितेंद्र ठाकूर यांनी केलं स्पष्ट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now