पीडितेला घेऊन फेसबुक लाईव्ह करणे रुपाली ठोंबरेंना पडले महागात, महिला आयोग करणार कारवाई

शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या वादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्या लाईव्हमध्ये त्यांनी पीडितेची ओळख उघडी करत तिची बाजू मांडली होती. पण आता या फेसबुक लाईव्हमुळे रुपाली ठोंबरे अडचणीत आल्या आहे. महिला आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल शेवाळे प्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी पीडितेची ओळख उघडी केली आहे. त्यामुळे आता महिला आयोग विधी विभागाचा अभिप्राय मागवून पुढील कारवाई करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

पीडितेची ओळख उघडी करणं, तिला कॅमेऱ्यासमोर आणत फेसबुक लाईव्ह करणं चुकीचं आहे. त्यामुळे याला अनेक संघटनांनी विरोध केला होता. तसेच महिला आयोगाकडे काही संघटनांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. त्यामुळे आता महिला आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्या म्हणाल्या की, माझ्यासोबत ही पीडिता आहे. तिला न्याय मिळत नसल्यामुळे लाईव्ह यावं लागलं. राज्य महिला आयोगाकडून आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे तरीही पोलीस कारवाई करत नाहीये.

तसेच माझ्या लाईव्हवर जर कोणाची तक्रार असेल तर ती पीडितेला असेल. बाकी कोणी तक्रार करत असेल तर ते ‘मिंधे’ गटाचे नेते असतील. पीडित महिला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत असेल तर कोणी तक्रार दाखल करू शकत नाही, असेही रुपाली ठोंबरे यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
ऑडिशन घेत असल्याचे सांगत पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार
माझे स्तन दाबले, पँटमध्ये हात घातला अन्…; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला बॉलीवू़ड डायरेक्टरचा भांडाफोड
४० कढया आमटी, १ लाख बाजरीच्या भाकऱ्या, देवाच्या प्रसादासाठी पुण्याजवळील ‘या’ गावात उसळली गर्दी