‘बिग बॉस 16’मध्ये दिसणारा साजिद खानवरील आरोपांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही आहे. शर्लिन चोप्रा, आहाना कुमार, मंदाना करीमी यांच्यानंतर आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे.
जेव्हा ती कामासाठी साजिद खानला भेटायला गेली तेव्हा तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. साजिद खान जेव्हापासून बिग बॉसचा भाग बनला आहे, तेव्हापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अनेक अभिनेत्र्या त्याच्यावर गंभीर आरोप करत आहेत.
त्याचवेळी आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड हिने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, ‘मी बऱ्याच दिवसांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने माझी साजिद खानसोबत एका पार्टीत ओळख करून दिली, त्यानंतर मी खूप खूश होते. त्याने मला सांगितले की उद्या तू ऑफिसला ये, मी एक चित्रपट करतोय त्यात तुला काहीतरी काम मिळेल.
मला कामाची गरज असल्याने मी दुसऱ्याच दिवशी साजिदच्या ऑफिसमध्ये गेले. दरवाजा उघडताच त्याने मला मिठीत घेतले. माझे ब्रेस्ट दाबायला सुरुवात केली. पँटमध्ये हात टाकला. ह्या प्रकाराने मी प्रचंड घाबरले. हे काय करताय.. असं मी साजिदला विचारलं. त्यावर ‘एवढं तर चालतं…’ असं तो म्हणाला.
मी तुला लगेच प्रमुख भूमिका तर देऊ शकत नाही. पण साईड रोल तर नक्की देईल, पण त्याबदल्यात मला काय मिळेल? असा प्रश्न त्याने मला विचारला. मी खूप चांगला अभिनय करेल असं मी साजिदला म्हणाली. त्यावर त्याने मला आणखी जवळ ओढलं आणि नको ते करायला सुरुवात केली.
‘एवढं तर चालतं ना जयश्री… म्हणून पुढे त्याने अश्लिल संभाषण सुरुच ठेवलं. अर्धा तासच मी ऑफिसमध्ये थांबले. मी जर आणखी काही वेळ थांबले असते तर त्याने माझ्यावर अतिप्रसंग केला असता. मी कशीबशी तिथून निसटले, असा धक्कादायक प्रसंग अभिनेत्री जयश्री गायकवाडने सांगितला.
मी माझ्या मित्र मैत्रिणींना हे सांगितलं. मात्र तू हे सगळं दुसरं कुणाकडे सांगू नको. आपण छोटे आहोत तो साजिद खान आहे. आपलं काही चालणार नाही, तू कुणाकडे काही बोलू नको. असं मला माझ्या मित्र मैत्रिणींनी समजावलं. पण माझ्या मनात एवढं होतं की एक दिवस याचा भांडाफोड करायचा, याच्याविरोधात आपण बोलायचं.
“मी मराठी मुलगी, त्यात जयभीमवाली पोरगी. बाहेर कुठे सांगीतलं तर घराणं, इज्जत या गोष्टी आडव्या येणार. आपलीच बदनामी होणार, या भीतीमुळे त्यावेळी मी शांत बसले. पण त्याचवेळी मनात पक्का निर्धार केला होता की एक ना एक दिवस याचा भांडाफोड नक्की करायचाच.
साजिद खानवर मीटू दरम्यान अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर साजिद खानच्या करिअरवरही परिणाम झाला. त्याचवेळी, यावर्षी तो ‘बिग बॉस 16’ मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसत आहे. शोमध्ये एंट्री घेताना घमंडी साजिदने सांगितले होते की, मला स्वतःचा अभिमान आहे. त्याने काही फ्लॉप चित्रपटही केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
लाइव्ह मॅचमध्ये संतप्त भारतीय फलंदाजाने केले ‘असे’ कृत्य, BCCI करू शकते मोठी कारवाई, करिअरला धोका
ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरवा पोशाखच का घालतात? जाणून घ्या खरे कारण…